Supriya Sule News: वारकऱ्यांच्या ३५० वर्षांपूर्वीच्या संस्कृतीला गालबोट; आळंदीतील घटनेवरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

'वारीच्या साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या संस्कृतीला गालबोट लागलं, असं म्हणत टीका केली.
supriya sule
supriya sule saam tv
Published On

Supriya Sule News: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात काल वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला. या सोहळ्यादरम्यान, वारकरी आणि पोलिसांची बाचाबाची झाल्याची पाहायला मिळाली. या घटनेवरून राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. 'आळंदीतील घटनेमुळे वारीच्या साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या संस्कृतीला गालबोट लागलं, असं म्हणत टीका केली. (Latest Marathi News)

सुप्रिया सुळे यांनी आळंदीतील घटनेवरून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'आळंदीमध्ये घडलेली घटनेचा मी जाहीर निषेध करते. याप्रकरणाचे जे व्हिडिओ बाहेर आले ते धक्कादायक होते. सातत्याने या देशातील पोलीस यंत्रणा एखादा अत्याचार होतो किंवा एखाद्या मुलीचा खून होतो. तिथे कधीच नसतात. जिथे आपल्या ऑलिम्पिकच्या मुली मेडल घेऊन येतात आणि आंदोलन करतात, त्यांच्यावर लाठीचार्ज करायला पोलीस सगळ्या पुढे जातात'.

supriya sule
Chor Bazaar: चोर बाजार फिरण्यासाठी आलेल्या परदेशी युट्युबरवर हल्ला, व्हिडीओ पाहून बसेल धक्का

'गेल्या साडेतीन वर्ष विठ्ठलाचे नमन करत आल्यावर आळंदीवरून पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी शांततेच्या मार्गाने जे आपले वारकरी जात असतात. वारकऱ्यांची साडेतीनशे वर्षांपूर्वीची संस्कृती आहे, याला गालबोट लागला आहे, अशा सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या.

'दिल्लीतल्या मुलींवर पोलिसांनी हल्ले केले,वारकरी संप्रदायाच्या विरोधात पोलीस जे वागले आहेत हे अतिशय निंदनीय आहे. नक्की पोलीस कुणाच्या बाजूने आहेत, जो गुन्हा करतो पोलीस त्यांच्या बाजूने असतात. ज्या शांततेच्या मार्गाने काही करत असतात, त्यांच्या विरोधात कारवाई केली जाते, अशी टीका देखील सुप्रिया सुळे यांनी केली.

supriya sule
Congress State President Change : काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार? प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता; कुणाची नावं चर्चेत?

भाजपवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'भारतीय जनता पार्टीला आंब्याच्या झाडावर दगड मारायला आवडतात. त्याच्यामुळे अजित पवार,सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षापुढे काही अजेंडा नाही. भारतीय जनता पार्टी रोज आमच्यावर टीका करीत आहेत, याच्यावरून समजत आहे कोणतं नाणं जास्त चालतं आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com