...म्हणून मागील वर्षभरात अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून आले जिल्हा परिषदेच्या शाळेत

Corona काळात लॉकडाऊन झाले आणि त्यामुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती ही ढासळली गेली. मात्र मुल शिक्षणापासून वंचित राहू नये अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते.
...म्हणून मागील वर्षभरात अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून आले जिल्हा परिषदेच्या शाळेत
...म्हणून मागील वर्षभरात अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून आले जिल्हा परिषदेच्या शाळेतदिलीप कांबळे
Published On

मावळ : सध्या आपला मुलगा इंग्रजी माध्यमात (English Medium) शिकून मोठा व्हावा अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. त्यामुळे आता खाजगी शाळा आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना टाकण्यात पालकांचा कल जास्त दिसून येतो. परंतु मावळ तालुक्यात हे चित्र वेगळं असल्याचे पहायला मिळत आहे. मावळ तालुक्यात सुमारे 350 पेक्षा जास्त पालकांनी आपल्या मुलांना खाजगी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढून चक्क जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकल्याचे चित्र आहे.

मावळ तालुक्यात मागील एक वर्षात सुमारे 350 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी खाजगी किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या शाळेत ऍडमिशन घेतले आहे. कोरोना (Corona) काळात लॉकडाऊन झाले आणि त्यामुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती ही ढासळली गेली. मात्र मुल शिक्षणापासून वंचित राहू नये अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. खाजगी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांची अवास्तव फी ही अनेक पालकांना परवडत नव्हती. शिवाय अवास्तव फी घेऊन देखील ऑनलाईन शिक्षण हे व्यवस्थित दिले जात नसल्याने अनेक पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना शिक्षणासाठी पाठवले.

...म्हणून मागील वर्षभरात अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून आले जिल्हा परिषदेच्या शाळेत
Nana Patole : राज्य सरकार पवारांच नव्हे उद्धव ठाकरेंच - नाना पटोले

खाजगी तसेच इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेत असताना आणि आता जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असताना खूप फरक जाणवत असल्याची भावना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून जिल्हा परिषदेच्या शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत. तर पालकांना खाजगी किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या फी परवडत नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असल्याचे देखील विद्यार्थ्यांनी सांगितले. परंतु त्या शाळेपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळेत सोयी सुविधा आणि शिक्षण हे चांगलं असल्याची भावना देखील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

खाजगी किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना ज्या सोयी सुविधा असतात त्याच आता जिल्हा परिषदेच्या शाळेत मिळत असल्याने पालकांचा ओघ आता जिल्हा परिषदेच्या शाळेकडे वाढला आहे. खाजगी शाळांमध्ये अवाजवी फी देऊन देखील जे शिक्षण मिळत नाही ते जिल्हा परिषदेच्या शाळेत एकही रुपया फी न देता मुलांना मिळत आहे. याशिवाय मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचे देखील काम जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक करत असतात.

त्याचप्रमाणे शाळेची इमारत किंवा आसपासचा परिसर सुशोभित करण्यासाठी गावातील गावकरी देखील एकत्र येत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांचे देखील रुपडे पालटत आहे. खाजगी किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेच्या शाळेत वाढता ओघ ही निश्चितच एक कौतुकास्पद गोष्ट आहे. त्यासाठी गावातील लोक एकत्र येऊन करत असलेली मदत आणि शिक्षकांचे योगदान हे नक्कीच यासाठी कारणीभूत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com