Stray Dog : भटक्या कुत्र्यांमुळे पुणेकर हैराण; वर्षात २५ हजारांहून अधिक व्यक्तींवर हल्ला

Stray Gogs in Pune : पुण्यात मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. वर्षभरात तब्बल २५ हजारांहून अधिक व्यक्तींवर कुत्र्यांनी हल्ला केला आहे.
Stray Gogs in Pune
Stray DogSaam TV
Published On

शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास मोठ्याप्रमाणात वाढला असून कुत्रे चावण्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. मागील वर्षभरात शहरातील जवळपास २५ हजारांहून अधिक नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. या धक्कादायक आकडेवारीने पुणेकरांच्या मनात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे.

शहरात दर महिन्याला मोकाट कुत्र्यांनी चावल्याची संख्या २ हजारांवर आहे. मे महिन्यात तर ही संख्या ३ हजारांच्या जवळ पोहोचली असून या महिन्यात तब्बल २ हजार ८३९ नागरिकांना चावा घेतल्याची नोंद झाली आहे. यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही, असं संतप्त नागरीक म्हणत आहेत.

Stray Gogs in Pune
First Aid after Dog Bite : तुम्हालाही कुत्रा चावलाय? रेबीज होण्याआधी घ्या ही काळजी

प्रत्येक महिन्यात मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलेल्या नागरिकांची संख्या

एप्रिल२०२३-१६८७

मे२०२३-१८३६

जून२०२३-२०२३

जुलै२०२३-२१३७

ऑगस्ट२०२३-२४२८

सप्टेंबर२०२३-२३००

ऑक्टोबर२०२३-२५१३

नोव्हेंबर२०२३-२०८९

डिसेंबर२०२३-१९७१

जानेवारी२०२४-१९७३

फेब्रुवारी२०२४-२०९३

मार्च२०२४-१९६१

एप्रिल२०२४-१९२०

मे२०२४-२८३९

जून२०२४-२१९९

जुलै२०२४-२०१२

ऑगस्ट२०२४-१९३७

आज जागतीक रेबीज दिवस आहे. कुत्र्‍याने हल्ला केल्यावर त्यावर योग्य ते उपचार न घेतल्यास त्या व्यक्तीला रेबीज होण्याची शक्यता आसेत. त्यामुळे यापासून आपला बचाव कसा करावा हे प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे.

रेबीज रोगाची लक्षणे

रेबीज झालेल्या व्यक्तीला शरीरातील स्नायूंमध्ये प्रचंड वेदना जास्त ताप येतो. व्यक्तीची डोकेदुखी प्रचंड वाढते. तसेच संबंधित व्यक्तीचं मानसिक संतुलन सुद्धा फार बिघडतं. त्या व्यक्तीला अचानक पाण्याची भीती वाटू लागते. त्यामुळे कुत्र्‍याने हल्ला केल्यावर लगेचच यावर उपचार घेणे महत्वाचे असते. काही व्यक्ती याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांना पुढे रेबीज झाल्याचे समजते.

२०३० पर्यंत भारत रेबीजमुक्त करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय कृती आराखडा आखला आहे. त्यामुळे ‘वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस-मिशन रेबीज’ आणि महानगरपालिकेच्या वतीने भटक्या श्वानांच्या लसीकरण केले जाणार आहे. ही मोहिम २८ सप्टेंबर २०२४ पासून राबवली जाणार आहे.

Stray Gogs in Pune
Dog Attack In Bengaluru: मॉर्निंग वॉकला निघालेल्या वृद्ध महिलेवर १२ कुत्र्यांचा हल्ला; रूग्णालयात नेताना मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com