Vande Bharat Express: ‘वंदे भारत’वर झोपडपट्टीवासीयांचा राग! मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या गाडीवर दगडफेक

पश्चिम बंगालमध्ये 'वंदे भारत' ट्रेनवर दगडफेक होण्याच्या घटना ताज्या असतानाच आता मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या गाडीवरही दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.
Vande Bharat Express
Vande Bharat ExpressSaam Tv
Published On

सचिन जाधव

Vande Bharat Train: एसी लोकल ट्रेननंतर आता सेमी हायस्पीड ट्रेन असलेल्या 'वंदे भारत' ट्रेनवर झोपडपट्टीवासीयांचा राग असल्याचे समोर आले आहे.पश्चिम बंगालमध्ये 'वंदे भारत' ट्रेनवर दगडफेक होण्याच्या घटना ताज्या असतानाच आता मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या गाडीवरही दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News)

Vande Bharat Express
Mumbai Crime: मुंबई हादरली! बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत नवऱ्याचं भयंकर कृत्य! गाठला कृरतेचा कळस

या घटनेत प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. पुण्याच्या झोपडपट्टी परिसरातून झालेल्या दगडफेकीमुळे रेल्वे पोलीस अलर्ट झाले आहे. याआधी मुंबईत (Mumbai) उपनगरीय मार्गावर सुरू केलेल्या एसी लोकलवर कळवा, मुंब्रा, दिवा, कांजुरमार्ग परिसरात दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्याचीच पुनर्रावृत्ती पुण्यात झाली असून सोलापूरला जाणारी 'वंदे भारत' ट्रेन पुणे (Pune) स्थानकातून पुढे निघताच दगडफेकीची घटना घडली आहे.

यामध्ये गाडीची काच फुटली आहे. मात्र सुदैवाने प्रवाशांना कोणतीही इजा झाली नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी दगडफेक करणार्‍यांचा रेल्वे पोलीसांकडून शोध घेतला जात आहे. याआधीही पुणे येथील शिवाजीनगर परिसरातून वंदे भारत ट्रेनवर (Vande Bharat Express) दगडफेक झाली होती. या दगडफेकीच्या घटनेला आळा घालण्यासाठी पुणे विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे रुळालगत गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेवर सीएसएमटी- शिर्डी आणि सीएसएमटी-सोलापूर या वंदे भारत एक्स्प्रेस १० फेब्रुवारी २०२३ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आली. या दोन्ही एक्सप्रेसला प्रवाशांच्या तुफान प्रतिसाद मिळत आहे. (Maharashtra News)

Vande Bharat Express
Nagpur Crime News: लाच घेणं पडलं महागात! व्हिडिओ व्हायरल होताच वाहतूक पोलिसाला गमवावी लागली नोकरी

यापूर्वीही दगडफेकीच्या घटना

याआधी ३ जानेवारीला पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक करण्यात आली होती. ट्रेन दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसीडेवा भागाजवळ ते न्यू जलपाईगुडीकडे जात होती. यादरम्यान रेल्वेच्या सी-3 (सी-3) आणि सी-6 (सी-6) डब्यांवर दगडफेक करून खिडकीच्या काचा फोडल्या आहेत.

त्याच दिवशी मालदा शहरापासून 50 किमी अंतरावर असलेल्या कुमारगंज रेल्वे स्थानकाजवळ वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेत वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्याची काच फुटली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com