Nagpur Crime News: लाच घेणं पडलं महागात! व्हिडिओ व्हायरल होताच वाहतूक पोलिसाला गमवावी लागली नोकरी

Latest News: सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे.
traffic police suspended
traffic police suspendedSaam Tv
Published On

Nagpur News: नागपूरमध्ये (Nagpur) एका वाहतूक पोलिसाला (Traffic Police) लाच घेणं खूपच महागात पडलं आहे. या पोलिसाचा लाच घेताना व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला होता. या व्हायरल व्हिडिओनंतर या पोलिसावर निलंबनाची (Police Suspended) कारवाई करण्यात आली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे.

traffic police suspended
Nagpur Ajit Pawar Banner: ‘वचनाचा पक्का अन् मुख्यमंत्रीपदासाठी पक्का’; सासूरवाडीनंतर नागपुरात झळकले अजितदादांचे बॅनर्स

नागपूरच्या तुकडोजी महाराज चौकात कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक पोलिसाने नियम तोडणाऱ्या सरकारी महिला कर्मचारीला अडवले होते. या महिला कर्मचारीला या वाहतूक पोलिसाने चालन करण्याची तंबी देऊन 300 रुपयांची लाच मागितली. त्याठिकाणी असणाऱ्या एका दुसऱ्या व्यक्तीने या पोलिसाचा लाच घेताना व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता.

वाहतूक पोलिसाचा लाच घेतानाचा हा व्हिडिओ अवघ्या काही सेकंदाच सोशल मीडयावर व्हायरल झाला. 7 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वाहतूक पोलिस आणि सरकारी महिला कर्मचारी चालनाबाबत चर्चा करत आहेत. त्यानंतर या महिला कर्मचाऱ्यासोबत असलेली व्यक्ती वाहतूक पोलिसाला पैसे देताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे वाहतूक पोलिस विभागात खळबळ उडाली.

traffic police suspended
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : परीक्षेत एका विद्यार्थ्याचा दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; खळबळजनक घटनेनं शिक्षकही हादरले

या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागपूर पोलिस उपायुक्त यांनी तात्काळ दखल घेतली. याप्रकरणी पोलिस उपायुक्त चेतना तिडके यांनी या वाहतूक पोलिसाला तडकाफडकी निलंबित केले. फक्त 300 रुपयांच्या लाचेसाठी या वाहतूक पोलिसाला आपली नोकरी गमवावी लागली. दरम्यान, अशाप्रकारचे पोलिसांचे लाच घेतानाचे अनेक व्हिडिओ याआधी देखील व्हायरल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com