Good News: 'कोकण'वासीयांसाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा!

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणवासीयांसाठी मोठी घोषणा केली आहे.
Good News: 'कोकण'वासीयांसाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा!
Good News: 'कोकण'वासीयांसाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा!Saam Tv
Published On

मुंबई: गणपती उत्सव (Ganapati Festival 2021) सुरु होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत. गणेश उत्सव हा महाराष्ट्रात उत्सहात साजरा केला जातोच पण कोकणात तो अतिशय उत्सहात साजरा केला जातो. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे (Coronavirus) यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात यावा अशा सुचना राज्य सरकारकडुन देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभुमीवर राज्य सरकारची एक बैठक झाली त्यात काही महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणवासीयांसाठी मोठी घोषणा केली आहे.

Good News: 'कोकण'वासीयांसाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा!
कोस्टल रोडच्या भ्रष्टाचारात शिवसेनेची भागिदारी? -आशिष शेलारांचा सवाल

गणपती उत्सवाला 5 दिवस बाकी आहेत. यंदाही गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा, पुण्यावरुन कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची घोषणा मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी यंदाही मुंबई-गोवा, मुंबई-कोल्हापूर मार्गावर टोलमाफी मिळणार आहे. खड्डे दुरुस्ती, पोलीस, वाहतूक पोलीस, अशा आणि इतर अनेक उपाययोजना करण्यासाठी आज बैठक पार पडली. कोकण मार्गावरील टोल सवलत, टोल स्टिकर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नागरिकांना गाडीची माहिती दिल्यानंतर स्टिकर दिले जाईल. गणेशोत्सवाच्या 2 दिवस आधी आणि विसर्जनाच्या 2 दिवसानंतर सेवा कार्यरत असणार आहे.

दरम्यान, टोल नाक्यांवर वाहनांची रांग लागलेली असते. मुंबई-गोवा महामार्ग आणि एक्स्प्रेस वे ने कोल्हापुरमार्गे कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आता मुंबईतून कोकणात जाण्यास प्रवाशाची सुरुवात झाली आहे. या दिवसात कोकणात जाणासाठी खासगी, सरकारी बसेस, कोकण रेल्वेंची संख्या वाढत असते. प्रवाशांना सहज तिकीट मिळत नाही. आपल्या स्वत:च्या खासगी वाहनाने मुंबईकर मोठ्या संख्येने कोकणात गणपतीसाठी जात असतात. मात्र, यावर्षी या सगळ्यांना टोलमाफी मिळणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com