मुंबईतील शाळा गजबजल्या, शिक्षण विभागाने दिल्या विशेष सुचना

शाळा सुरू करताना शिक्षण विभागाने विशेष सुचना दिल्या आहेत.
मुंबईतील शाळा गजबजल्या, शिक्षण विभागाने दिल्या विशेष सुचना
मुंबईतील शाळा गजबजल्या, शिक्षण विभागाने दिल्या विशेष सुचनाSaam TV

रश्मी पुराणिक

मुंबई: राज्यातील कोरोनाचा कमी झालेला प्रभाव व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व बोर्डच्या, सर्व माध्यमाच्या व नगरबाह्य विभागाच्या सर्व शाळा तसेच विशेष व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्व शाळा, मैदानी खेळ व शाळेचे विविध शैक्षणिक उपक्रम यासह पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने सुरु करण्यास मनपा आयुक्तांनी मंजूरी दिली आहे. आज मुंबई शहरातील सर्व शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्या आहेत. मुलांचा उत्साह व मित्रांना बर्‍याच दिवसांनी भेटल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसडंत होता. 

शाळा सुरू करताना शिक्षण विभागाच्या विशेष सुचना

1. कोरोनाची (Corona) पार्श्वभूमी विचारात घेऊन मनपा आयुक्त यांच्या मंजुरीने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व बोर्डच्या, सर्व माध्यमाच्या व नगरबाहय विभागाच्या शाळा बंद अथवा सुरु करण्याबाबत यापूर्वी निर्गमीत करण्यात आलेली सर्व कोविड 19 आरोग्य विषयक सुचनांचे पालन करावे.

मुंबईतील शाळा गजबजल्या, शिक्षण विभागाने दिल्या विशेष सुचना
नागपुरात महिन्यातभरात एकही हत्या नाही, इतिहासात पहिल्यांदाच घडलं!

2. 2 मार्च 2022 पासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व बोर्डच्या, सर्व माध्यमाच्या व नगरबाहय विभागाच्या पूर्व प्राथमिक ते 12 वी पर्यंतच्या सर्व शाळा कोव्हीड -19 पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने 'ऑफलाईन' पद्धतीने सुरु कराव्यात.

3. विशेष व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळासुद्धा ऑफलाईन पद्धतीने पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने सुरु करण्यात याव्यात.

4. विद्यार्थी शाळेत प्रवेश करताना त्यांचे तापमान तपासणी करण्यात यावी.

5. शिक्षक - शिक्षकेतर कर्मचा-यांची उपस्थिती 100 टक्के असणे आवश्यक आहे.

6. शिक्षक - शिक्षकेतर कर्मचा-यांचे 100 टक्के लसीकरण करावे.

7. कोव्हीड -19 पूर्वीच्या वेळापत्रकानुसार शाळांच्या नियमित वर्गाच्या तासामध्ये मैदानी खेळ, शालेय कवायती तसेच विविध सहशालेय शैक्षणिक उपक्रम घेण्यात यावेत व या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास प्रवृत्त करावे.

8. वर्गाध्यापन, स्कूलबस / स्कूलव्हॅन मध्ये व शालेय परिसरात मास्क वापरणे बंधनकारक असेल परंतु मैदानी खेळ, शारिरीक कवायतींसाठी मास्क बंधनकारक नसेल.

9. कोव्हीड -19 पूर्वीच्या वेळापत्रकानुसार शाळांना मधली सुट्टी असेल तसेच विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत पूर्वीप्रमाणे आहार घेण्यास परवानगी असेल.

10. विद्यार्थ्यांसाठी लसीकरण अत्यंत सुरक्षित असून तज्ञांच्या सल्ल्याने त्याची निश्चिती करण्यात त्याअनुषंगाने पालकांच्या संमतीने विद्यार्थ्यांचे 100% लसीकरण पूर्ण होण्यासाठी प्रशासकीयलसीकरण पूर्ण होण्यासाठी प्रशासकीय अधिकारी

(शाळा), आरोग्य अधिकारी व विभागीय सहा. आयुक्त यांनी समन्वय साधून विशेष शिबिरांचे आयोजन शाळांमध्ये करण्यात यावे.

11. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले कोमॉर्बिडिटीज व क्रॉनिक व्याधींनी ग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांचे संमतीपत्र आवश्यक असेल.

12. कोव्हीड 19 सदृश्य लक्षणे (उदा. सर्दी, खोकला, घसादुखणे व ताप इ.) आढळल्यास पालकांनी विद्यार्थ्याला शाळेत पाठवू नये. .

13. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यस्थापनांच्या पूर्णक्षमतेने शाळा सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्याकरीता खाजगी बससेवा व बेस्ट बसमधून पूर्णक्षमतेने प्रवास करण्यास परवानगी देण्यात यावी.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com