नागपुरात महिन्यातभरात एकही हत्या नाही, इतिहासात पहिल्यांदाच घडलं!

गेल्यावर्षी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकड्यांनुसार देशात सर्वाधिक हत्या होणाऱ्या शहरांच्या यादीत नागपूरचे नाव आघाडीवर होते.
Nagpur Police
Nagpur PoliceSaam TV

नागपूर: हत्येच्या घटनांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या उपराजधानी नागपूरात गेल्या फेब्रुवारी महिन्यात हत्येचा एकही गुन्हा दाखल झालेले नाही. नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच महिन्यातभरात एकही हत्या झालेली नाही. नागपूर शहर (Nagpur Crime) हे क्राईम कॅपिटल म्हणून ओळखल जाते. महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचं शहर असलेलं नागपूर हत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. गेल्यावर्षी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकड्यांनुसार देशात सर्वाधिक हत्या होणाऱ्या शहरांच्या यादीत नागपूरचे नाव आघाडीवर होते. मात्र, याच नागपूर शहरात फेब्रुवारी महिन्यात एक सुद्धा हत्येचा गुन्हा दाखल झालेला नाही. ही नागपूरकर आणि पोलिसांसाठी दिलासादायक बातमी आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये नागपूर शहरात अनेक मोठी हत्याकांड घडली. ज्यामुळं नागपूर पोलिसांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर सुद्धा प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, नागपूर शहरांमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एक ही हत्या न होण्यामागे पोलिसांनी केलेली विशेष उपाययोजना आणि जनतेचा विश्वास संपादन करण्यात पोलिसांना यश, यामुळं हे शक्य झाले असल्याची प्रतिक्रिया नागपूर चे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com