Anil Parab on ST Workers Protest
Anil Parab on ST Workers ProtestSaam TV

ST Workers Protest : ...तर कारवाई करू; अनिल परबांचा कडक इशारा

एसटी महामंडळातील आंदोलक कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी इशारा दिला.
Published on

मुंबई : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी काल, शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. या आंदोलनावेळी काही कर्मचाऱ्यांनी चपला फेकल्या. यानंतर आज, शनिवारी परिवहन मंत्री आंदोलक कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. मात्र, कायदा हातात घेतला तर, कठोर कारवाई केली जाईल, असं परब म्हणाले.

Anil Parab on ST Workers Protest
ST Workers Protest: काही आंदोलक दारु प्यायले होते; पोलीस तपासात उघड

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला. कधीही कोणी कायदा हातात घेतला तर, राज्य सरकार गप्प बसणार नाही. एसटी कर्मचारी हे आमचेच आहेत. आजही कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूती आहे. कुणावरही अन्याय करू इच्छित नाही. सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन परब यांनी यावेळी केले.

एसटी कर्मचाऱ्यांनी आपली रोजीरोटी सांभाळावी. एसटी व्यवस्थित चालावी आणि ग्रामीण भागातील जनतेला होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. कायदा हातात घेऊन कुणी भडकवत असेल तर, त्याबाबत कठोर कारवाई नक्कीच केली जाईल, असा इशारा परब यांनी यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांना दिला.

Anil Parab on ST Workers Protest
वडापावची हाव ST कर्मचाऱ्यांच्या अंगलट; जोरदार चर्चा

'सदावर्तेंनी कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली'

एसटी कर्मचाऱ्यांबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. मात्र, कायदा हातात घेतला तर, कारवाई करण्यात येईल, असे परब म्हणाले. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन कर्मचाऱ्यांनी करावे. सरकारवर कुठलाही दबाव आणू नये, असं परब म्हणाले. यावेळी अनिल परब यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आरोप केला. सदावर्ते यांनी विलीनीकरण करणारच असे सांगितले. कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली. सदावर्तेंना आलेले अपयश लपवण्यासाठी हे कृत्य करण्यात आले. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना काहीही मिळवून दिलेले नाही, असेही परब म्हणाले. चुकीच्या नेतृत्वामुळे संप चिघळला, असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com