Atul Bedekar Passed Away : बेडेकर मसाल्याचे संचालक अतुल बेडेकर यांचे दीर्घ आजाराने ५६व्या वर्षी निधन

Atul Bedekar Passed Away : कर्करोगाशी झुंज देताना वयाच्या 56 वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
Atul Bedekar
Atul BedekarSaam TV
Published On

Atul Bedekar Passed Away :

मसाले आणि लोणचे खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या व्हीपी बेडेकर अँड सन्स समूहाचे संचालक अतुल व्ही. बेडेकर यांचे शुक्रवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. कर्करोगाशी झुंज देताना वयाच्या 56 वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बेडेकर यांच्या पार्थिवावर आज मुंबईतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बेडेकर हा लोणचे आणि मसाल्यांचा ब्रँड आज जागतिक पातळीवर नामवंत ब्रँड आहे. दर्जेदार उत्पादने, ग्राहकांच्या अभिरुचीची समज, अपेक्षेनुसार बदल आणि काळाच्या सुसंगतपणे व्यवसाय वाढवण्याचे अनुभवी कौशल्य यामुळे बेडेकर यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.

मसाले, लोणचे, पापड, रेडी मिक्स इत्यादी बनवणारा बेडेकर समूह दिवंगत व्हीपी बेडेकर यांनी सुरू केला होता. 1910 मध्ये गिरगावमध्ये किराणा दुकान म्हणून त्यांनी व्यवसाय सुरू केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com