Special Report : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पाणीकपातीमुळे शॉवर आणि दाढी करण्यावर बंधनं?

Mumbai Water Problem : मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी. मुंबईत शॉवर आणि दाढी करण्यावर बंधनं येणारंय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठलाय. त्यामुळे मुंबईवरच पाणी कपातीचं संकट घोंघावतंय.
Special Report
Special Report Saam Digital

भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी. मुंबईत शॉवर आणि दाढी करण्यावर बंधनं येणारंय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठलाय. त्यामुळे मुंबईवरच पाणी कपातीचं संकट घोंघावतंय. मुंबईत पाणीकपात लागू गेली जाणारंय. पाहूयात. त्यावरचा हा रिपोर्ट.

राज्यातील धरणांनी तळ गाठलाय. त्यामुळे अनेक जिल्ह्यात टँकरनं पाणीपुरवठा सुरुय. त्यातच आता थेट राज्याची राजधानी असलेल्या मुंबईवरच पाणी कपातीचं संकट घोंघावतंय. मुंबई महापालिकेनं 30 मेपासून पाणीकपातीची घोषणा केलीय. त्यामुळे मुंबईकरांना आंघोळीपासून दाढीपर्यंत पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीनं करावा लागणारंय. मुंबईकरांना मनासारखा शॉवर घेता येणार नाही. इतकच नाही दाढी करताना पाणी अत्यंत जपून वापरावं लागेल. मुंबईत दोन टप्प्यात पाणीकपात केली जाणारंय. 30 मे पासून 5 टक्के तर 5 जून पासून 10 टक्के पाणी कपात केली जाईल.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 1 लाख 40 हजार 202 दशलक्ष लीटर पाणीसाठा आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 9.69 टक्केच पाणीसाठी उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 5.64 टक्के कमी पाणीसाठा आहे. केवळ मुंबई महापालिकाच नाही तर ठाणे, भिवंडी-निजामपूर या महापालिकांनाच पाणीकपातीच्या संकटाला सामोरं जावं लागणारंय. पाऊस झाल्यानंतर जोवर धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत नाही तोवर ही पाणीकपात लागू असेल. पाण्याचं संकट लक्षात घेऊन महापालिकेने नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सूचना दिल्या आहेत.

Special Report
Maharashtra Drought: मराठवाड्याच्या दुष्काळ कथांनी महाराष्ट्र सुन्न; राज्याचे कृषीमंत्री आहेत कुठं?

पाणी वापरासंदर्भात महापालिकेच्या सूचना

पिण्यासाठी गरजेइतकंच पाणी घ्या

आंघोळीसाठी शॉवरचा वापर करु नका

नळ सुरु ठेवून दात घासणं,दाढी करणं टाळा

घरकामं करतांना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका

आधीच्या दिवसाचं पाणी शिळं समजून फेकू नका

वॉशिंग मशीनमध्ये एकाचवेळी शक्य तेवढे कपडे धुवा

व्हरांडा,जिने धुवून काढण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसून घ्या

कुठेही गळती आढळल्यास तत्काळ दुरुस्ती करुन घ्या

गेल्या वर्षी पावसानं ओढ दिल्यानं धरणांमधील पाणीसाठा घटलाय. दुसरीकडे कडक उष्म्यामुळे सारी जनताच त्रासलीय. त्याला मुंबईकरदेखील अपवाद नाहीत. आधीच उन्हाच्या झळा त्यात पाणीकपातीचं संकट. त्यामुळे जोवर पावसाळा सुरू होत नाही तोवर मंबईकरांनाही या संकटाचा सामना करावा लागणार हे निश्चित.

Special Report
Heat Wave : अकोला जिल्ह्यात ३१ मे पर्यंत जमावबंदीचा आदेश; मोठं कारण आलं समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com