Mega Block on Central Railway : मध्य रेल्वेवर शनिवार-रविवारी विशेष पॉवर ब्लॉक, लोकलच्या टाईम टेबलवर काय परिणाम होणार?

Railway News : ब्लॉकदरम्यान कल्याण ते अंबरनाथ डाऊन दक्षिण-पूर्व लाईन आणि अंबरनाथ ते कल्याण अप दक्षिण-पूर्व मार्गावर वाहतूक बंद असेल.
Mumbai Local Train
Mumbai Local Train saam tv
Published On

Mumbai News : मध्य रेल्वेवर येत्या २६-२७ ऑगस्ट रोजी पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. उल्हासनगर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून प्लॅटफॉर्म २ वर पादचारी पुलाचे कॉलम स्थलांतरित करण्यासाठी आणि हायड्रा मशीनद्वारे उभारणीसाठी कल्याण-अंबरनाथ विभागात डाउन आणि अप दक्षिण-पूर्व मार्गांवर रात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकमध्ये उल्हासनगर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून प्लॅटफॉर्म २ वर पादचारी पुलाचे कॉलम स्थलांतरित करण्यासाठी आणि हायड्रा मशीनद्वारे उभारणीचे काम करण्यात येणार आहे.

Mumbai Local Train
NAMO Farmer Scheme : नमो-किसान योजनेचा पहिलाच हप्ता टेक्निकल इश्यूमुळे रखडला, ८६ लाख शेतकरी प्रतीक्षेत

ब्लॉकची वेळ

ब्लॉकदरम्यान कल्याण ते अंबरनाथ डाऊन दक्षिण-पूर्व लाईन आणि अंबरनाथ ते कल्याण अप दक्षिण-पूर्व मार्गावर वाहतूक बंद असेल. २६ आणि २७ ऑगस्ट रोजी म्हणजे शनिवार-रविवारी मध्यरात्री ०१.१० वाजल्यापासून ते ०२.१० वाजेपर्यंत १ तास हा ब्लॉक असेल. (Trending News)

Mumbai Local Train
Himachal Pradesh Buildings Collapsed : अवघ्या काही सेकंदात पत्त्यांसारख्या कोसळल्या ७ इमारती, कुल्लूमधील थरारक व्हिडीओ आला समोर

लोकलवर काय परिणाम होणार?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ११.५१ वाजता सुटणारी अंबरनाथसाठीची लोकल आणि अंबरनाथ येथून १०.०१ आणि १०.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या लोकल रद्द राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२.०४ वाजता सुटणारी अंबरनाथसाठीची लोकल कुर्ला येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.  (Latest Marathi News)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२.२५ वाजता सुटणारी कर्जतसाठीची लोकल कल्याण स्थानकावर १.५१ ते २.१० या वेळेत नियमित केली जाईल. ब्लॉक कालावधीत कल्याण ते अंबरनाथ दरम्यान मालवाहतूक गाड्यांची वाहतूक (ट्रॅफिक) बंद राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com