सूरज मसूरकर
मराठा बांधवांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. आरक्षणासाठी राज्य सरकारने मोठा पाऊल उचललं आहे. मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एक दिवसाचे हे विशेष अधिवेशन असेल.
एक दिवसांच्या या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणावर कायदा पारित करण्याची शक्यता आहे. तसेच सगेसोयरे शब्दाच्या अनुषंगाने कायदा पारित करण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यात आहे. (Latest Marathi News)
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा आंदोलनाबाबत अधिसूचना जारी केली होती. मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या होत्या. शासनाकडून तसं पत्रही मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आलं होतं.
मात्र मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण करत सरकारवर दबाव आणला आहे. त्यामुळे सरकारने दिलेल्या आश्वासनांचं लवकरात लवकर कायद्यात रुपांतर करण्याची मागणी आता मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मनोज जरांगे पाटील मागील चार दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांनतर सरकारने देखील हालचाली सुरु केल्या आहेत.
सरकारने मराठा आरक्षणबाबत जी अधिसूचना काढली आहेत त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. याशिवाय अंतरवाली सराटीसह मराठा आंदोलनादरम्यान मराठा बांधवांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत, शासनाने सगेसोयरे यांचा कायदा पास करावा, विधिमंडळाचे अधिवेशन घ्यावे, हेैदराबाद व इतर ठिकाणचे गॅजेट स्वीकारावे इत्यादी मागणीसाठी अंतरवाली सराटी मनोजच जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.