Someshwar Sahakari Sakhar Karkhana : 'सोमेश्वर' ठरणार ऊसाला राज्यात सर्वाधिक भाव देणारा कारखाना, जाणून घ्या नवा दर

या कारखान्याची नुकतीच संचालक मंडळाची बैठक झाली.
Someshwar Sahakari Sakhar Karkhana
Someshwar Sahakari Sakhar Karkhanasaam tv
Published On

Baramati News : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाने सन 2022 - 23 या हंगामात गाळप केलेल्या उसाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रति टन 3350 रुपये दर जाहीर केला आहे. संपूर्ण राज्यात एफआरपी पेक्षा प्रतिटन पाचशे रुपये ज्यादा दर देणारा सोमेश्वर साखर कारखाना हा राज्यातील पहिला कारखाना ठरला आहे.

Someshwar Sahakari Sakhar Karkhana
Kalyan- Shil Road : आजपासून पाच दिवसांसाठी कल्याण- शिळ महामार्गावरील वाहतुकीत मोठा बदल; जाणून घ्या कारण

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत ऊसाला प्रति टन 3350 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. (Maharashtra News)

Someshwar Sahakari Sakhar Karkhana
Sangli DCC Bank: अध्यक्षांच्या दालनात संचालकांची झटापट? सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील प्रकरण पाेचले पाेलिस ठाण्यात; जीवे मारण्याची तक्रार दाखल

जेष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार ,खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून सातत्याने कारखानाला मार्गदर्शनास सहकार्य लाभते. तसेच ऊस उत्पादक, सभासद ,अधिकारी कामगार आणि ऊस तोडणी वाहतूकदार कामगारांच्या सहकार्यातून ही घोडदोड अशीच कायम राखण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही जगताप यांनी दिली.

Someshwar Sahakari Sakhar Karkhana
Satara News : ज्येष्ठ विचारवंत डाॅ. आ. ह. साळुंखेंची 12 ऑगस्टला बीजतुला : अभिनेते सयाजी शिंदे

सोमेश्वर कारखान्याने गेल्या वर्षी तुटून गेलेल्या उसाला २ हजार ८४६ रुपये एफआरपी दिली होती. यामध्ये संचालक मंडळाने टनाला ५४ रुपयांची अधिकची भर टाकून सभासदांना २ हजार ९०० रुपये अदा केले होते. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना अजून टनाला ४५० रुपये मिळणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com