...तर शिवसेना शिल्लक राहणार नाही; शिंदे गटातील आमदाराचं खळबळजनक वक्तव्य

'संदीपान भुमरे यांनी सामना कार्यालयात येऊन माझ्यासमोर लोटांगण घातलं होतं.'
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSaam TV

मुंबई: राज्याच्या राजकारणात अभुतपुर्व असं बंड करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे ४० आमदार फोडले. शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील सरकार कोसळलं. दरम्यान, राज्यात शिंदे-भाजप गटाचे सरकार सत्तेवर आलं. या सर्व घडामोडीत बंडखोर आमदारांवर त्यांनी गद्दारी केल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला होता.

या आरोपांवरती उत्तर देताना, 'आम्ही सर्व हिंदु्त्वाच्या मुद्द्यावरुन सेनेतून बाहेर पडलो आहोत, तसंच महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीकडून (NCP) आमच्यावरती अन्याय करण्यात येत होता, त्यामुळे आपण या सरकारमधून बाहेर पडत बंड केल्याचं सांगत बंडखोर आमदारांनी आरोपांचं खंडण केलं होतं.

बंडखोर आमदारांच्या याच वक्तव्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोरांवर टीका केली राऊत म्हणाले, 'बंडखोर आमदार जेव्हा मुंबईतून सुरतला गेले तेव्हा ते म्हणत होते, आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो, दुसऱ्या दिवशी म्हणाले, आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निधी देत नव्हते म्हणून आम्ही बाहेर पडलो. त्यामुळे तुम्ही बंड का केलं हे ठरविण्यासाठी एक कार्यशाळा घ्या; असं राऊत म्हणाले.

दरम्यान, यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आमदार संदीपान भुमरेंवरती (Sandipan bhumare) टीका केली, 'संदीपान भुमरे यांनी सामना कार्यालयात येऊन माझ्यासमोर लोटांगण घातलं होतं, म्हणाले तुमच्यामुळे मला मंत्रिपद मिळालं.' राऊतांच्या याच वक्तव्याला भुमरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भुमरे म्हणाले, 'संजय राऊत शिवसेनेत राहिले तर शिवसेना शिल्लक राहणार नाही. राऊत बोलत राहिले तर शिवसेनेत आता जे काही १० -१२ आमदार शिल्लक राहिले आहेत. ते देखील शिवसेना सोडतील. शिवाय जे काही ५० लोक शिवसेनेतून गेलेत ते देखील संजय राऊतांमुळेच बाहेर गेले आहेत असा हल्लाबोल संदीपान भुमरे यांनी राऊतांवर केला आहे.

तर संजय राऊतांनी राहिलेली शिवसेना (Shivsena) संपवायची सुपारी घेतली असल्याचा गंभीर आरोप देखील भुमरे यांनी यावेळी केला. शिवाय आपणाला मंत्री व्हायला देखील ३० वर्ष वाट पाहावी लागली, माझ्या मागून निवडून आलेले लोटांगण घालून मंत्री झाले असतील मला लोटांगण घालायची गरज नाही अशा शब्दांमध्ये भुमरे यांनी राऊतांना सुनावलं.

Sanjay Raut News
शिवसैनिकांवर खोटे गुन्हे, तरी उद्धव ठाकरेंनी आमचे ऐकले नाही; आमदार चंद्रकांत पाटील

दरम्यान, शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) यांनी देखील राऊतांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले, 'संजय राऊत यांनी शिवसेना काय आहे. हे आता समजून घेतलं पाहिजे, शिवसेनेतील सगळे कार्यकर्ते, नेते हे वरिष्ठांच्या पाया पडतात, लोटांगण घातलं म्हणजे तुम्हाला पण त्यामध्ये काऊंट केलं. पण तुम्हाला ते मोठेपण कळालं नाही. कार्यकर्त्यांच्या भावना समजत नाहीत, दुकानासारखे शिवसेनेला वापरू नका अन्यथा शिवसेना संपेल असं शिरसाठ म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com