Sion ROB News
Sion ROB News Saam TV

Sion Bridge News : सायन रेल ओव्हर ब्रीज पाडण्याची तारीख पुन्हा पुढे ढकलली, कारण...

Mumbai Latest News Updatession : पूल वाहतुकीसाठी बंद केल्यास या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
Published on

सचिन गाड

Mumbai News :

सायन रेल ओव्हर ब्रीज पाडण्याची तारीख पुन्हा पुढे ढकलली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा लक्षात घेता ही डेडलाईन पुढे ढकलण्यात आली आहे. आज मध्य रात्रीपासून पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार होता. मात्र दहावी बारावीच्या मुलांची होणारी गैरसोय बघता ही डेडलाईन पुढे ढकलण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पूल वाहतुकीसाठी बंद केल्यास या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पूर्व द्रुतगती मार्ग, एलबीएस रोड आणि धारावी यांना जोडणारा महत्वाचा रेल्वे पूल आहे. त्यामुळे दोन वर्षात नवीन पूल बांधण्याचं आश्वासन मध्य रेल्वेने दिलं आहे.  (Latest Marathi News)

Sion ROB News
Railway Ticket: लोकसभेपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; रेल्वे तिकीट दरात मोठी कपात, प्रवाशांना दिलासा

का पाडला जाणार आहे पूल?

महत्त्वाचा मानला जाणारा हा रेल्वे पूल ब्रिटीशकालीन आहे. ११२ वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल आता सुस्थितीत नसल्याचं पुढे आलं आहे. तसेच सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी हा पूल पाडण्यात येणार आहे.

मात्र हा पूल पाडल्यास येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. नागरिकांना आपला मार्ग बदलावा लागणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडूनही या पूलाच्या पाडकामास विरोध होत आहे.

Sion ROB News
Water Problem : ठाण्यातील या भागात 50 टक्के पाणी कपात, काय आहे कारण? किती दिवस पाणी कपात? जाणून घ्या

कसा असेल नवीन पूल?

नवीन बांधला जाणार पूल हा जुन्या पुलाच्या जागीच असणार आहे. या पुलाला साधारण ५० कोटींचा खर्च अपक्षित आहे. रेल्वे आणि मुंबई महापालिका मिळून हा पूल बांधणार आहेत. सिंगल स्पॅन थ्रू गर्डर असा ४९ मीटर लांब आणि २९ रुंद असा हा पूल असणार आहे. या पूलाला बनवण्यासाठी जवळपास २ वर्ष लागतील असं देखील प्रशासनाने सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com