Water Problem : ठाण्यातील या भागात 50 टक्के पाणी कपात, काय आहे कारण? किती दिवस पाणी कपात? जाणून घ्या

Thane Water Problem : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील पाणी उदंचन केंद्रामध्ये आगीची दुर्घटना घडली होती. यात संपूर्ण केंद्र बंद पडले आहे. त्यामुळे मुंबईकडे होणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे.
Water Problem
Water Problem Saam Digital
Published On

Water Problem

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील पाणी उदंचन केंद्रामध्ये आगीची दुर्घटना घडली होती. यात संपूर्ण केंद्र बंद पडले आहे. त्यामुळे मुंबईकडे होणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने पाणी पुरवठ्यामध्ये 50 टक्के कपात लागू केली आहे. मुंबई महापालिकेमार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा होत असलेल्या ठिकाणीही सोमवारपासून (26 फेब्रुवारीपासून) पुढील सूचना मिळेपर्यंत 50 टक्के पाणी कपात लागू केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात लुईसवाडी विभाग – (हाजुरी, लुईसवाडी, साईनाथ नगर, काजुवाडी, रामचंद्र नं 1, रघुनाथ नगर, अंबिका नगर), कोपरी विभाग – (कोपरी, धोबीघाट, कन्हैया नगर जलकुंभ परिसर, आनंदनगर), नौपाडा विभाग - (गावदेवी जलकुंभ, टेकडी बंगला परिसर,) या ठिकाणी 50 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Water Problem
KDMC News : कल्याणच्या टीएलआर कार्यालयात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या

पुण्यात 'या' दिवशी पाणीपुरवठा बंद

पुणे (Pune) शहरावर पाणी टंचाईचं संकट आहे. परंतु अजून पाणी कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. परंतु अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात कल्याणीनगर, कळस भागात गुरुवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरण्याची गरज आहे. (Latest Pune News)

पाणीपुरवठा बंद का असणार आहे, असा प्रश्न निर्माण होत (Pune Water Supply) आहे. भामा आसखेड प्रकल्पांतर्गत कुसमाडे वस्ती येथील नवीन टाकीला मुख्य जलवाहिनी जोडणे आणि ठाकरसी टाकीवरील स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी गुरुवार कळस, माळवाडी, कल्याणीनगर, विमानतळ, रामवाडीसह इतर भागातील पाणी पुरवठा बंद असणार आहे.

 मुंबईकरांनो! पाणी जपून वापरा; शहरातील काही भागात पाणीपुरवठा बंद

मुंबई पालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या पिसे येथील पाणी उदंचन केंद्रामध्ये अचानक आगीची दुर्घटना घडल्यामुळे पाणीपुरवठा राहणार बंद राहणार आहे. मुंबई पूर्व उपनगरातील पूर्वेचा भाग, ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलायशय, ट्रॉम्बे उच्च जलाशय घाटकोपर निम्नस्तरीय जलाशय तसेच शहर विभागातील एक दक्षिण आणि एफ उत्तर गोलंजी फोसबेरी, राओली, भंडारवाडा या जलाशयातून होणारा पाणी पुरवठा आज मध्यरात्रीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहील. तसेच उर्वरित शहर विभाग पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरमधील पाणीपुरवठ्यात ३० टक्के कपात करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) आपल्या प्रसिद्धीपत्रकात दिलीय.

Water Problem
Maratha Aarakshan News: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्यात आरक्षणाची अंमलबजावणी २६ फेब्रुवारीपासून लागू होणार, सरकारकडून राजपत्र जारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com