Pune University: फ्राईड राईसमध्ये आढळलं रबर, पुणे विद्यापीठाच्या कॅन्टिनमधील धक्कादायक प्रकार

Rubber Found in Fried Rice at Pune: पुणे विद्यापीठातील कॅन्टिनमधील जेवणामध्ये रबर आढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही विद्यार्थ्यांनी फ्राईड राईस मागवला होता त्यामध्ये रबर आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Pune University: फ्राईड राईसमध्ये आढळलं रबर, पुणे विद्यापीठातल्या कॅन्टिनमधील धक्कादायक प्रकार
Rubber Found in Fried Rice at PuneSaam Tv
Published On

अक्षय बडवे, पुणे

गेल्या काही दिवसांपासून सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या कधी होस्टेलमध्ये ढेकूण सापडतात तर कधी किडे. अनेक वेळा जेवनात आळ्या सापडल्याच्या देखील तक्रारी विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अनेक वेळा केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी विद्यापीठातील वस्तीगृहात ढेकणं आढळल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता.

अनेक विद्यार्थ्यांना या ढेकणांनी चावा घेतल्यामुळे त्यांना रुग्णालयात सुद्धा दाखल करण्यात आलं होतं. हा प्रकार ताजा असतानाच आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असलेल्या फूड कोर्टमधील एका चायनिज सेंटरमधील जेवणात चक्क रबर आढळून आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील फूड कोर्ट येथील Route 93 या चायनिजच्या गाळ्यात जेवणासाठी काही विद्यार्थी गेले होते. एका हिंदी विभागाच्या विद्यार्थ्यांच्या जेवणात रबर आढळल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. बुधवारी सायंकाळी हिंदी विभागाचे विद्यार्थी जेवण करण्यासाठी गेले असताना त्या ठिकाणी Route 93 चायनिज या गाळ्यात खाण्यासाठी फ्राईड राईस आणि नूडल्स मागवले असता त्यामध्ये रबर आढळून आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Pune University: फ्राईड राईसमध्ये आढळलं रबर, पुणे विद्यापीठातल्या कॅन्टिनमधील धक्कादायक प्रकार
Pune Crime : पुण्यात तरुणीचा लग्नाला नकार, तरुणानं नको ते केलं, शरीरसंबंधाचे 'ते' VIDEO शूट; मैत्रिणीला दिसताच भयंकर उलगडा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या उच्चशिक्षण संस्थांमध्ये जेवणात रबर आढळणे ही केवळ एक घटना नाही, तर व्यवस्थेतील निष्क्रियतेचे आणि बेफिकिरीचे भयावह दर्शन आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच पोषक अन्न मिळाले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणी खेळत असेल तर प्रशासनाने वेळीच लक्ष घालून उपाययोजना कराव्यात अशी मागणी भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समिती चे सदस्य शिवा बारोळे यांनी केली आहे.

Pune University: फ्राईड राईसमध्ये आढळलं रबर, पुणे विद्यापीठातल्या कॅन्टिनमधील धक्कादायक प्रकार
Pune Crime : १५ वर्षांपासून फरार, एका लघुपटात दिसला, प्रशासन खडबडून जागी; पुण्यातील प्रशांत कांबळेला अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com