Sanjay Raut : संजय राऊतांचा जामीन रद्द होणार?; ईडीच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी

कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला.
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSaam TV
Published On

Sanjay Raut News : कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला. मुंबईच्या पीएमएलए न्यायालयाने संजय राऊतांचा जामीन मंजूर केला. दरम्यान, संजय राऊत यांना जामीन मिळातच ईडीने हायकोर्टात धाव घेत जामीन रद्द होण्याची मागणी केली. आज ईडीच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. (Sanjay Raut Latest News)

Sanjay Raut News
Amit Shah : श्रद्धा वालकर प्रकरणावर अमित शहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, त्यावेळी आमचे सरकार....

त्यामुळे संजय राऊत यांचा जामीन रद्द होणार? की त्यांना दिलासा मिळणार याकडेच सर्वांच लक्ष लागून आहे. पीएमएलए न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करावा, संजय राऊत यांच्याविरोधात आमच्याकडे पुरावे आहेत, असं ईडीने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. आता उच्च न्यायालय नेमका काय निकाल देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. (Latest Marathi News)

काय आहे प्रकरण?

पत्राचाळ प्रकल्पातून संजय राऊतांनी पैसे कमावले, असे ईडीने (ED) म्हटलं आहे. वाधवान बंधूंसोबत संगनमत संजय राऊत यांनी पैसे कमावले, असा या आरोप ईडीने केला आहे. पत्राचाळ प्रकरणातले प्रमुख आरोपी संजय राऊतच असल्याचंही ईडीने यात म्हटलं आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत हा घोटाळा झाला असाही उल्लेख ईडीच्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

Sanjay Raut News
Maharashtra Politics ...मग नेहरूंनी केलेली चूक PM मोदी का सुधारत नाहीत? सामनातून भाजपला सवाल

काय आहे पत्राचाळ घोटाळा?

रिपोर्टनुसार पत्राचाळ मुंबईतील गोरेगाव येथे आहे. चाळीत राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने एचडीआयएलच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला कंत्राट दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन तीन हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती.

गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक राकेश वाधवान आहे. वाधवान यांच्यासोबत संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांचा संबंध आहे. प्रवीण राऊत यांनी राकेश वाधवानसोबत मिळून पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक आणि सुटका झाली. त्यानंतर पुन्हा 2 फेब्रुवारी 2022 रोजी प्रवीण राऊत यांना पुन्हा अटक झाली होती.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com