VIDEO: मुंबईत विकासकामाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने; दोन्हीकडून समोरासमोर जोरदार घोषणाबाजी

एल्फिन्स्टन विभागात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर विकास कामांच्या उदघाटन करण्याच्या श्रेयवादाच्या मुद्यावरून आमने सामने आले.
Mumbai
MumbaiSaam Tv

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात घेता सर्वच पक्ष कामाला लागले आहे. शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरे गटाला आपलं मुंबईतील वर्चस्व कायम राखण्याचं मोठं आव्हान आहे. यातच मुंबईत आता विकासकामांवरून ठाकरे गट आणि शिंदे गटात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.

एल्फिन्स्टन विभागात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर विकास कामांच्या उदघाटन करण्याच्या श्रेयवादाच्या मुद्यावरून आमने सामने आले. एल्फिन्स्टन विभागातील मुरलीधर सामंत मार्ग, फिटवला रोड फुटपाथ नूतनीकरणाचे उदघाटन उद्या ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांच्या हस्ते होणार आहे.  (Latest Marathi News)

Mumbai
Sanjay Gaikwad : ...अन्यथा भाजपसोबतची युती तुटेल; शिंदे गटातील आमदाराचा थेट इशारा

मात्र शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि महापालिका पालिका अधिकारी पाहणी करायला गेले असताना तिथे ठाकरे गटाकडून घोषणाबाजी करण्यात आली. ठाकरे गटाच्या म्हणयानुसार या कामाचा पाठपुरावा आमदार अजय चौधरी यांनी केला असून याचं श्रेय शिवसेना ठाकरे गटाचं आहे. तर समाधान सरवणकर यांच्या म्हण्यानुसार या कामाचा पाठपुरावा आम्ही केला होता.

Mumbai
Sanjay Raut : संजय राऊतांना मध्यरात्री राहुल गांधींचा फोन; नेमकी काय चर्चा झाली?

रस्ता डांबरीकरणाच्या आणि फुटपाथ नूतनीकरणाच्या शुभारंभासाठी माजी नगरसेवक समाधान सरवणकर पोहचले होते. परंतु यावेळी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी समाधान सरवणकर आणि पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या कामासाठी पालिकेकडे मी पाठपुरावा केला होता. अजय चौधरी हे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यावर बोलण मी योग्य नाही. आम्ही विकास कामे करत राहू अशी प्रतिक्रिया समाधान सरवणकर यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com