आताची सर्वात मोठी बातमी! आढळराव पाटील शिवसेनेतच; पक्षाने दिले स्पष्टीकरण

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
shivajirao adhalrao patil
shivajirao adhalrao patilSaam Tv
Published On

मुंबई - शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे (Shivsena) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली अशी बातमी मुखपत्र सामनातून प्रसिद्ध करण्यात आली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली असल्याचे सागंण्यात आले होते. मात्र शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेतच आहेत. 'सामना' वृत्तपत्रात छापण्यात आलेली बातमी अनावधनाने प्रसिद्ध करण्यात आली. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शप्पत घेतल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. एकनाथ शिंदेंचा फोटो शेअर करत त्यांनी त्यावर गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब' असं कॅप्शन लिहिलं होतं. मात्र पक्षप्रमुखांचा फोटो न वापरता बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्यानंतर आणि त्यांचे समर्थन केल्याच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र आता शिवसेनेने या घटनेचे स्पष्टीकरण दिले असून माफी मागितली आहे.

shivajirao adhalrao patil
नांदेडमध्ये भाजपकडून विजयी रॅली; फटाक्यांची आतषबाजी

कोण आहेत शिवाजीराव आढळराव पाटील?

शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे मोठे नेते मानले जातात. पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात आढळराव पाटील यांचा मोठा वाटा आहे. 2004 मध्ये त्यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला. त्यानंतर 2009 आणि 2014 मध्ये देखील त्यांनी लोकसभा निवडणुकीत देखील मिळवला. शिरुर लोकसभा मतदारसंघाचं पाटील यांनी 15 वर्ष प्रतिनिधीत्त्व केलं. त्यांना संसदरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com