मुंबई : ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या शिवसेना भवनाच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते योगेश देशपांडे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. एखाद्या ट्रस्टची जागा शिवसेना भवनाला कशी दिली? असा प्रश्न त्यांनी तक्रारीत उपस्थित केला आहे.
योगेश देशपांडे यांनी शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्टच्या विरोधात तक्रार केली आहे.मात्र योगेश देशपांडे कोण आहेत? नेमकी आत्ताच तक्रार का देखल केली, या प्रश्नावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निर्णयानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाकडून विधान भवनातील शिवसेना कार्यालयावर ताबा मिळवला आहे. तसेच संसदेतील शिवसेना कार्यालयावर देखील ताबा मिळवला आहे. त्यानंतर शिंदे गट शिवसेना भवनावर ताबा मिळवणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मात्र, शिवसेना (Shivsena) भवन हे पक्षाच्या अखत्यारित नसून शिवाई ट्रस्टकडे आहे. त्यामुळे शिंदे गट थेट पक्षाच्या माध्यमातून शिवसेना भवनावर दावा करण्याची शक्यता कमी आहे. याचदरम्यान, ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या शिवसेना भवनाच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे अॅड योगेश देशपांडे यांनी तक्रार दिली आहे. एखाद्या ट्रस्टची जागा शिवसेना भवनाला कशी दिली? असा सवाल योगेश देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना भावनाविरोधात तक्रार कारणारे योगेश देशपांडे कोण आहेत?
योगेश देशपांडे यांची वकील तथा सामाजितक कार्यकर्ते म्हणून ओळख आहे. देशपांडे हे गेली 6-7 वर्षे मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून अनेक खटले लढवले. गुजरातमधील बेस्ट बेकरी प्रकरण, मुंबई मधील उर्दू भवन संदर्भातील याचिका असे अनेक महत्त्वाचे खटले लढवले आहेत. नुकताच गाजलेला खटला म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या केतकी चितळे यांचा खटला हा देशपांडे यांनीच हाताळला आहे.
शिंदे गट शिवसेना भवनावर दावा करणार का? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...
शिंदे गट शिवसेना भवनावर दावा करण्याचा चर्चेवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.' शिवसेना भवनावर आम्ही ताबा घेणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
'आम्ही कोणाच्याही कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नाही आम्हाला त्याची गरज नाही, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे नेत आहोत. त्याच्या कोणत्याही मालमत्तेवर आमचा दावा नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.