Sanjay Raut News : शिंदे गटाकडून विधान भवनातील शिवसेना कार्यालयाचा ताबा, शिवालय ताब्यात घेणार? संजय राऊत म्हणाले...

Sanjay Raut On Shinde Group: शिंदे गटाच्या या कृत्यावर खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Sanjay Raut
Sanjay Rautsaam tv

Shivsena News: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निर्णयावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाने पक्षाचे सरकारी कार्यालय ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे. शिंदे गटाच्या या कृत्यावर खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

'शिंदे गट सरकारी कार्यालयावरील ताबा घेत आहेत. पण लाखो शिवसैनिकांच्या मनावर ताबा कसा मिळवाल, असा सवाल करत संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

Sanjay Raut
Maharashtra Politics : 'जो ना भगवान राम का, वो ना किसी काम का'; आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

शिवसेना पक्षाच्या सरकारी कार्यालयावर ताबा घेण्यावर संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, ते सरकारी कार्यालयावर ताबा घेत आहेत. पण लाखो शिवसैनिकांच्या मनावर ताबा कसा मिळवाल. शिवसेना महाराष्ट्राचा आत्मा आहे. शिवसेना मराठी माणसाचा आवाज आहे. बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना मराठी माणूस, मुंबई महाराष्ट्रासाठी केली'.

'शिवसेना संपवण्यासाठी दिल्लीश्वरांनी ६० वर्षांपासून प्रयत्न सुरु होते. ते आम्ही हाणून पाडले. पण आता काही जणांना यश आलं असलं तरी महाराष्ट्राची जनता या विरोधात पेटून उठली आहे. निवडणुका घ्या, सगळं समोर येईल. दोन हजार कोटीचं पॅकेज ज्या मालमत्ता घेण्यासाठी खर्च झालं. मुळात गेल्या सहा महिन्यातील राजकारण असत्य आणि खोटेपणावर आधारीत आहे',असा घणाघात राऊत यांनी केला.

Sanjay Raut
Jalna News: तलावात मासेमारी करायला मित्रांसोबत गेला; अंदाज न आल्‍याने तरुण बेपत्ता

कथित राजकीय सौदेबाजीवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, 'रेट कार्डमध्ये नगरसेवक विकत घेण्यासाठी दोन कोटी,आमदार विकत घेण्यासाठी 50 कोटी, खासदार विकत घेण्यासाठी साठी ७५ कोटी,शाखा प्रमुख विकत घेण्यासाठी 50 लाख रुपये आहे. यासाठी एक एजंट ही नियुक्त करण्यात आला. हा पैसा येतो कुठून, असा सवाल राऊत यांनी केला.

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी १२ 12 आमदारांच्या फाईलवरील सही. जी अखेरपर्यंत केली नाही. त्या मुद्द्यावर त्यांनी एका मुलाखतीत खुलासा केला. त्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, ' कोश्यारी हे खोटं बोलत आहे. मुळात कॅबिनेटने एखादी शिफारस पाठवली असेल तर १२ तासात मंजूर करायची असते. त्यांनी इकडंच-तिकडलं बोलू नये. कोश्यारी हे वयाने आमच्यापेक्षा मोठे आहेत. त्यांचा सदैव मान राखला. ते भाजपच्या प्रचारकासारखं वागत होते. भाजपच्या आदेशानुसारच वागत होते. कॅबिनेटच्या शिफारसी का मान्य केल्या नाहीत, हे त्यांनी आधी सांगावं'.

Sanjay Raut
MPSC EXAM : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर CM शिंदेचं मोठं वक्तव्य; म्हणाले,'सरकारची भूमिका...'

'भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर आता लक्ष द्यायची गरज नाही आहे. ते राज्यातून गेले आहेत. ते अनुभवी होते. राज्यपालपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांनी राजकीय प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना राजकीय उत्तर देऊ शकतो. ठाकरे सरकार बहुमतात होते. सरकार कसं स्थापन झालं, त्यात पडायचा राज्यपालांचा अधिकार नव्हता. बहुमतातील सरकारने शिफारशीनंतर मंजुरी द्यायला हवी होती. त्यांनी राजकारण करायला पाहिजे नव्हते, अशी टीका संजय राऊत यांनी कोश्यारी यांच्यावर केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com