'हे माझं शेवटचे अधिवेशन'; राज्य सरकारवर नाराज शिवसेना आमदाराचा आक्रमक पवित्रा

MMRDA ने तयार केलेली घर माझ्या लोकांना मिळाली नाहीत. त्यामुळे हे माझं सभागृहातील कदाचित शेवटचं भाषण असेल. ही घरे मिळाली तर लोक वाहून जातील.
Shivsena
ShivsenaSaam TV

रश्मी पुराणिक -

मुंबई : आज शिवसेनेच्या एका आमदाराने सभागृहात आक्रमक होत महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. आज राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा, वीज तोडणी यासह विविध मुद्द्यावरून हे अधिवेशन जोरदार गाजले. मात्र अधिवेशन सुरु असतानाच शिवसेनेच्या (Shivsena) एका आमदाराने चक्क सभागृहातच 'हे माझं शेवटचे अधिवेशन असल्याचे म्हणत सर्वाना आवाक केले.' हे आमदार दुसरे तिसरे कुणी नसून, शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे आहेत (Shivsena MLA Dilip Lande) सगळ्यात महत्वाचे म्हणजे दिलीप लांडे यांनी असे वक्तव्य करताच विरोधकांसह सत्ताधारी बाकावरील नेते देखील काही वेळासाठी आवक झाले. गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) तर चक्क त्यांच्या बाकावरून उठून दिलीप लांडेच्या बाकावर पर्यत गेले.

नेमकं काय आहे प्रकरण -

Shivsena
'गांधी परिवार काँग्रेसचं ह्रदय, त्यांच्याबद्धल अपप्रचार करणाऱ्यांना किंमत नाही'

दिलीप लांडे यांच्या मतदारसंघातील MMRDA ने बांधलेल्या घरांचा प्रश्न दिलीप लांडे यांनी सभागृहात उपस्थित केला. एमएमआरडीए ने तयार केलेली घर माझ्या लोकांना मिळाली नाहीत. त्यामुळे हे माझं सभागृहातील कदाचित शेवटचं भाषण असेल. ही घरे मिळाली तर लोक वाहून जातील. पण त्याआधी मीच वाहून जाईन असे म्हणत माझा 'विधी' करण्यासाठी सरकारने तरतूद करावी असे देखील ते म्हणाले. विधान सभेत अर्थसंकल्पावरील चर्चे दरम्यान शिवसेना आमदार दिलीप लांडे बोलत होते.

एकनाथ शिंदेनी घेतली दखल -

दरम्यान त्यांच्या या वक्तव्याची दखल घेत 'नगर विकास मंत्री म्हणून सांगतो दिलीप लांडे यांच्यावर ही वेळ येउ देणार नाही, मी त्यांना काही होऊ देणार नाही, नगरविकास मंत्री म्हणून मी सक्षम आहे.' असं वक्तव्य एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं आहे. तसंच घरे लवकरच दिली जातील असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com