Mumbai News : किशोरी पेडणेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेणार; काय आहे प्रकरण?

किरीट सोमय्या यांच्याकडून पेडणेकरांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत.
Kishori Pednekar
Kishori PednekarSaam Tv
Published On

मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra fadnavis)  यांची भेट घेणार आहेत. शिंदे गटावर सतत हल्लाबोल करणाऱ्या किशोरी पेडणेकर मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. किरीट सोमय्या यांच्याकडून पेडणेकरांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. या संदर्भात त्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.

किशोरी पेडणेकर यांच्या सासूबाई विजया पेडणेकर यांचे काल ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आपल्यावर होणाऱ्या आरोपांमुळे वयस्क विजया पेडणेकर यांनी धसका घेतला आणि त्यांचा मृत्यू झाला, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. (Latest News)

Kishori Pednekar
महाराष्ट्रासाठी गोड बातमी! पुण्यात ५०० कोटींच्या प्रकल्पाला मंजूरी; ५ हजार तरुणांना मिळणार रोजगार

भेटीआधी किशोरी पेडणेकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी घेतली आहे. या भेटीला उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आता किशोरी पेडणेकरांना वेळ देतात का हे पाहावं लागेल.

किरीट सोमय्या यांचे आरोप काय?

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना दादर पोलिसांनी समन्स पाठवून 31 ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावलं आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) घोटाळ्याप्रकरणी दादर पोलीस त्याची चौकशी करणार आहेत. दादर पोलिसांनी त्यांना शनिवारी बोलावले होते, मात्र त्या हजर झाल्या नाहीत. त्यामुळे दादर पोलिसांनी समन्स बजावलं आहे.

Kishori Pednekar
Tata Airbus Project: सरकारविरोधात राष्ट्रवादीचा एल्गार, गाजर दाखवून निषेध आंदोलन, फडणवीसांच्या घरी सुरक्षा वाढवली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआरए घोटाळ्याचा गुन्हा जून महिन्यात दाखल झाला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांचे नाव नाही. मात्र, त्यांचा या प्रकरणातील सहभागाचा तपास सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com