शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा नव्याने पक्षउभारणीला सुरूवात केली. शिवसेना सोडून इतर पक्षात गेलेल्या माजी आमदार तसेच पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरू आहे. अशातच ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, ठाकरे गटातील माजी आमदाराने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. (Latest Marathi News)
बबनराव घोलप यांचे पुत्र तसेच शिर्डीचे माजी आमदार योगेश घोलप यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर नाराज झालेल्या बबनराव घोलप यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे.
ठाकरे गटातील पित पुत्रांनी अचानक दोन बड्या नेत्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा धक्का बसणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभेतील ५ वेळा आमदार असलेले माजी मंत्री बबनराव घोलप हे काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा आहे.
बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी इच्छुक होते. मात्र, भाजपचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. याच पक्ष प्रवेशामुळे तसेच शिर्डीत लोकसभा मतदारसंघात नव्या संपर्कप्रमुखांची निवड केल्यामुळे नाराज बबनराव घोलप यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर शिर्डीत बॅनर्सही झळकले.
दरम्यान, रविवारी बबनराव घोलप हे मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन करत जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केलं. यानंतर घोलप यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. तर त्यांचे पुत्र यौगेश घोलप यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे आता नाराज असलेले पिता-पुत्र ठाकरेंची साथ सोडणार का? याकडेच सर्वांच लक्ष लागून आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.