महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण घटनापीठाकडं; गुरुवारी होणार सुनावणी

शिवसेना कुणाची यावरुन सर्वाच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Shivsena, supreme Court
Shivsena, supreme CourtSaam Tv
Published On

नवी दिल्ली : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड करत वेगळा गट स्थापन केला. शिंदे गटाने भाजपसोबत युती केली, आणि राज्यात सत्ता स्थापन केली. आता शिवसेना कुणाची यावरुन सर्वाच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी आज सुनावणी झाली. आज झालेल्या सुनावणीत हे प्रकरण ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे. पुढील सुनावणी आता गुरुवार २५ ऑगस्ट रोजी होणार आहे.

Shivsena, supreme Court
Mumbai: मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्महदनाचा प्रयत्न; स्वतःला पेटवून घेतल्याने शेतकरी गंभीर जखमी

आज ही सुनावणी सरन्यायाधीश एनव्ही रमन्ना यांच्या खंडपीठापुढे सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायाधीशांनी शिवसेनेची बाजू ऐकूण घेतली, आणि हे प्रकरण ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे. पुढील सुनावणी गुरुवारी २ दिवसांनी होणार आहे.

Shivsena, supreme Court
Sonali Phogat: कोण होत्या सोनाली फोगाट? असा होता टिक-टॉक स्टार ते राजकारणा पर्यंतचा प्रवास

पुढील होणाऱ्या सुनावणीमध्ये आमदार, खासदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार विधिमंडळ/ संसदेकडे आहे का? यावर तसेच पक्षाचे चिन्ह, नाव संदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिली जाणार का ?, गटनेते पद राजकीय पक्ष ठरवणार की विधिमंडळ पक्ष यांसह मविआने राज्यपालांकडे दिलेली १२ आमदारांची यादी योग्य की अयोग्य?, पक्षविरोधी कारवाया म्हणजे स्वतः मर्जीने पक्ष सोडणे म्हणता येईल का?, आदी मुद्यांसह व्हीप बजावण्याचे अधिकार कोणाला? तसेच नवीन गट तयार न करणे किंवा पक्ष विलीन करण्याचे पर्याय शिंदे समोर आहेत का? यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com