Political News: पुण्यात ठाकरे गटाला मोठा हादरा बसणार? नाराज नेता राजीनामा देण्याच्या तयारीत

Shivsena News: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कसबा मतदारसंघातील नेते विशाल धनवडे नाराज असल्याची चर्चा आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam TV
Published On

पुणे(Pune) : पुण्यात पोटनिवडणुकीवरुन सर्वच पक्षात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटालाही नाराजीचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कसबा मतदारसंघातील नेते विशाल धनवडे नाराज असल्याची चर्चा आहे.

महाविकास आघाडीकडून कसबा पोटनिवडणुकीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. महाविकास आघाडीकडून रवींद्र धनगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ठाकरे गटाचे विशाल धनवडे कसबा मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक होते. यामुळे ठाकरे गटाने विशाल धनवडे नाराज झाल्याची चर्चा आहे. (Latest News)

Uddhav Thackeray
Pune News: पुण्यातील हडपसर गाडीतळ येथील उड्डाणपूल आजपासून तीन दिवस बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन

नाराज विशाल धनवडे राजीनामा देण्याचा तयारीत असल्याचंही बोललं जात आहे. विशाल धनवडे यांच्याकडे कसबा क्षेत्ररक्षक पदाची जबाबदारी आहे.मात्र आता धनवडे राजीनामा देत ठाकरे गटाला धक्का देतात की त्यांची नाराजी दूर केली जाईल, हे लवकरच स्पष्ट होईल.

Uddhav Thackeray
Ajit Pawar: पोट निवडणुकीसाठी अजित पवार उतरले मैदानात, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या सुचना, म्हणाले; 'हलक्या कानाचे राहु नका...'

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

कसबा आणि चिंचवडमध्ये आज अर्ज मागे घेण्याचा शेटवचा दिवस आहे. कसब्यात एकूण 29 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. तर चिंचवडमध्ये 33जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

राहुल कलाटेंमुळे मविआची अडचण झाली आहे. तर कसब्यात ठाकरे गटाबरोबर युती असूनही संभाजी ब्रिगेडनं उमेदवारी अर्ज भरलाय. आज शेवटच्या दिवशी कोण माघार घेणार हे पाहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com