मुंबई: राज्यसभेच्या ६ जागांसाठीचं मतदान काल (शुक्रवारी) पार पडलं. भाजपने यात तिसरा उमेदवार दिल्याने राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात होते त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. या निवडणुकीचा (Election 2022) निकाल शनिवारी मध्यरात्री लागला. यात भाजपने दिलेला तिसरा उमेदवार निवडून आला असून शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरल्याचे मानले जाते. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. "भाजपने जागा जिंकली, पण भाजप विजयी झालं नाही" असा टोला लगावत "निवडणूक आयोगाने त्यांना (भाजपला) फेव्हर केलं आणि आमचं मत बाद केलं." असा गंभीर आरोप त्यांनी निवडणूक आयोगावर केला आहे. (Shiv Sena Winning Candidate Sanjay Raut Allegations On Election Commission For Favor To BJP In Rajya Sabha Election 2022 Maharashtra)
राज्यसभेच्या निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, भाजपचे पीयूष गोयल आणि अनिल बोंडे हे विजयी झाले. तर धनंजय महाडीक हे विजयी झाल्याने भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले. मात्र, शिवसेचेचे संजय पवार पराभूत झाल्याने शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले की, भाजपने नक्कीच जागा जिंकली. पण त्यांचा विजय झाला असं मी मानत नाही. पहिल्या पसंतीची सर्वाधिक मते ही संजय पवार यांना मिळाली. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत महाडीकांचा विजय झाला. मोठा विजय झाला ते चित्र निर्माण केलं पण तसं काही नाही. दोन-चार मतांची घासाघीस झाली. सगळ्या प्रमुख नेत्यांनी संजय पवारांची जागा जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पहिल्या पसंतीच्या मतांचा विचार झाला तर आम्ही जवळजवळ जिंकलो होतो. ही अतिशय किचकट प्रक्रिया आहे, पण तरीही त्यांचे अभिनंदन अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे.
पुढे राऊत म्हणाले की, आमच्या सर्व सहकाऱ्यांनी उत्तम व्यूहरचना केली होती. जिंकली एक जागा त्यांनी ठीक आहे. आमचा मतांचा कोटा ठरवला होता. माझे एक मत या लोकांनी बाद करायला लावलं. त्यांची दोन मते बाद होऊ शकत होती. निवडणूक आयोगाने त्यांना फेव्हर केलं आणि आमचं मत बाद केलं. निवडणूक आयोगाला वापरून निवडणूक जिंकत असतील तर तो विजय कसला? असं म्हणत राऊतांनी थेट निवडणूक आयोगावरच निशाणा साधला आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.