Sanjay Raut : हिंमत असेल तर.., संजय राऊतांचं थेट CM शिंदेंना चॅंलेज

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक बेळगाव सीमाप्रशानावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
Eknath Shinde And sanjay raut
Eknath Shinde And sanjay raut saam tv
Published On

Sanjay Raut News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक बेळगाव सीमाप्रशानावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ज्या प्रकारचं कर्नाटकचं सरकार सीमाप्रश्नावरती अत्यंत जागरूक आहे. तितकं महाराष्ट्राचं सरकार मला दिसत नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. २० लाखांचा मराठी भाषिक भाग ज्या पद्धतीने कर्नाटकात घातला गेला आहे, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे, या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिम्मत असेल तर पंतप्रधान मोदींसोबत बोलावं आणि राज्याला कळवावं, असं चॅंलेंज संजय राऊतांनी दिलं आहे.  (Latest Marathi News)

Eknath Shinde And sanjay raut
Maharashtra Politics : दोन महिन्यांनी महाराष्ट्रातील राजकारणात काय होणार?; भाजपच्या बड्या नेत्याच्या विधानानं खळबळ

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधत सीमाप्रश्नावर भाष्य करत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. सीमा प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी शिंदे (Eknath Shinde) यांना टोला मारला. ते म्हणाले, 'राज्याचे मुख्यमंत्री हेसुद्धा युती शासनाच्या काळात बेळगावसंदर्भात विषयाचे मंत्री होते. चंद्रकांत पाटीलही होते. पण हे दोन्ही मंत्री किती वेळा बेळगावात गेले… मी वारंवार सांगत होतो, जा म्हणून… आता तुम्ही असे काय दिवे लावणार आहात?' असा सवाल संजय राऊतांनी विचारला.

बेळगावला महाराष्ट्रात सहभागी करुन घेण्यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. पण आतापर्यंतचे सर्वच प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. पण तरीही राज्य सरकार त्याच जोमाने बेळगाव महाराष्ट्रात सामील करुन घेण्यासाठी लढणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अॅक्शन मोडवर आले आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चँलेज दिले आहे.

Eknath Shinde And sanjay raut
Sanjay Raut : मोठी बातमी! संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी होणार

काय म्हणाले संजय राऊत?

सीमाप्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, की सीमावासीय पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहत नाहीत , कायदेशीर लढ्यावर इतका खर्च करून वकील उपस्थित राहत नसतील, तर याबाबत राज्य सरकारने विचार करावा. आमचं कर्नाटकशी भांडण नाही पण हा न्यायालयाचा प्रश्न आहे. हिम्मत असेल तर मुख्यमंत्र्यांनी याबाबत पंतप्रधान यांच्याशी बोलावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायचं असेल तर जरूर भेटा. पण सीमाप्रश्नावर बोलत असताना सोबत दोन साक्षीदार घेऊन जा. त्यानंतर झालेली चर्चा ही जनतेसोबत उघड करावी. असं संजय राऊत म्हणाले.

Edited By- Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com