Maharashtra Politics : सुषमा अंधारे यांचा मतदारसंघ ठरला, पुण्यातील पोस्टर्सनंतर चर्चेला वेग, ठाकरे काय निर्णय घेणार?

Maharashtra Assembly election 2024 : शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा ठोकला आहे. आता दोन्ही पक्षाकडून दावा केल्यानंतर या जागेवरचे दावेदार ही समोर यायला लागले आहेत.
Sushma andhare
Sushma andhare
Published On

Sushma andhare : शिवसेना ठाकरे गटाकडून आगामी विधानसभा निवडणुकी साठीची रणनीती आखण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून ठाकरे सेना आपले सर्व महत्वपूर्ण मोहरे या विधानसभेच्या आखाड्यात उतरवणार असल्याचं बोललं जात आहे. त्यानुसार आता ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे देखील आगामी विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार असल्याचं बोललं जात आहे. त्या पुणे शहरातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ निवडणार असल्याचा देखील चर्चा सध्या सुरू आहेत.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांचे आमदार सुनील टिंगरे हे आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा अजित पवार गटाला सुटेल असं मानलं जात आहे. पण दुसरीकडे मात्र शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा ठोकला आहे. आता दोन्ही पक्षाकडून दावा केल्यानंतर या जागेवरचे दावेदार ही समोर यायला लागले आहेत.

Sushma andhare
Maharashtra Politics: विधानसभेला किती जागांवर लढणार, अजितदादांनी सांगितला प्लॅन, 6 आमदार संपर्कात असल्याचाही दावा

आता वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाला सोडावा, अशी मागणी करत थेट शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनाच या विधानसभा मतदारसंघातून उतरवण्याची तयारी स्थानिक शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. मतदारसंघात सुषमा अंधारे यांचे पोस्टर्सही झळकले आहेत. त्यामुळे वडगाव शेरी मतदारसंघात सुषमा अंधारे विधानसभेला नशीब अजमावणार का? याची चर्चा सुरु आहे.

Sushma andhare
Maharashtra Politics: महायुतीची महाबैठक! CM शिंदे, फडणवीस अन् अजित पवारांमध्ये ४ तास खलबतं; बैठकीत काय काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी

सध्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये गणेश उत्सवाच्या निमित्ताने लावण्यात आलेले पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मतदारसंघात लावलेल्या या पोस्टरवर सुषमा अंधारे यांचा मोठा फोटो वापरण्यात आला आहे. त्याशिवाय "उच्चशिक्षित निर्भीड कणखर व्यक्तिमत्व वडगावशेरी मतदारसंघाच्या सर्वागीण विकासासाठी एकच उत्तम पर्याय" असा मजकूरही लिहण्यात आला आहे. या मतदारसंघातून सुषमा अंधारे यांना विजय अत्यंत सोपा मानला जात आहे.

या मतदारसंघाची सध्याची गणित पाहिल्यास तब्बल 70 हजारापर्यंत शिवसेना ठाकरे गटाचा मतदार आहे. त्याशिवाय कल्याणीनगर अपघात प्रकरणांमध्ये सुषमा अंधारे यांनी घेतलेल्या भूमिकेचा देखील फायदा त्यांना होऊ शकतो असं स्थानिक नेत्यांचे मत आहे. त्यामुळे या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सुषमा अंधारे यांना निवडणूक लढण्याची गळ घालण्यात येत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सुषमा अंधारे या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढताना पाहायला मिळू शकतात, असं बोल जात आहे. त्यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी शिवसैनिक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com