बदलापूर - ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ (Ambernath)तालुक्यात भाजपने (BJP) शिवसेनेला धक्का दिला आहे. कारण वांगणीतील शिवसेनेच्या (Shivsena) ग्रामपंचायत सदस्यांसह जिल्हा परिषद सदस्यांच्या पतीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात आत्तापर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांवर शिवसेनेचं प्राबल्य होतं. मात्र वांगणी गटातील जिल्हा परिषद सदस्यांचे पती प्रमोद शेलार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी आज अचानक भाजप आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
हे देखील पहा -
विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी शेलार यांनी हा प्रवेश केल्याचं आमदार किसन कथोरे यांनी सांगितलं. तसंच सध्या राज्यातली परिस्थिती पाहता येत्या काळात शिवसेना कुठे आहे हे शोधण्याची वेळ येईल, असं म्हणत आमदार कथोरे यांनी शिवसेनेवर टीका केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.