Baburao Pacharne : शिरूर-हवेलीचे भाजपचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचं आज (गुरुवार) निधन झालं. ते कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी गेल्या काही दिवसांपासून झुंज देत हाेते. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांच निधन झालं आहे. सन २००४ ते २००९ आणि २०१४ ते २०१९ या दहा वर्षाच्या काळात दाेन वेळा शिरूर हवेलीचे त्यांनी आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले हाेते. (Baburao Pacharne Latest Marathi News)
माजी आमदार बाबूराव पाचर्णे हे गेल्या दीड दाेन वर्षापासून कॅन्सरशी झुंज देत हाेते. त्यांच्यावर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरु हाेते. वैद्यकीय अधिका-यांनी दिलेल्या माहितीनूसार पाचर्णे यांची प्रकृतीत कधी सुधारणा हाेत हाेती तर कधी पुन्हा त्यांना त्रास हाेत हाेता. दरम्यान आज पाचर्णे यांचे रुग्णालयातच निधन झालं.
पाचर्णे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला हाेता. त्यांना काेणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. तर्डाेबाची वाडी या गावातून त्यांनी आपली राजकीय कारकिर्द सुरु केली. ग्रामपंचायत सदस्य ते आमदार अशी त्यांची राजकीय कारकिर्द राहिली.
शिरूर ग्रुप ग्रामपंचायतीचे ते सन १९७८ ते ८४ कालावधीत सदस्य होते. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांनी प्रवेश केला. त्यांनी सलग आठ वर्षे बाजार समितीचे सभापतीपद भूषविलं. अनेक उत्तम निर्णय घेत त्यांनी शेतक-यांना आर्थिक पाठबळ दिलं.
सन १९९५ कालावधीत त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढली. त्यांना कॉंग्रेसकडून निश्चित मानली जात हाेती परंतु तसं न झाल्यानं त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात त्यांचे आव्हान उभं केलं. या निवडणूकीत त्यांना ६७८ मतांनी पराभव झाला. त्यानंतरही ते जनतेसाठी कार्यरत राहिले.
त्यानंतर सन १९९९ च्या निवडणूकीत त्यांनी कॉंग्रेसचं प्रतिनिधित्व केलं. त्यात त्यांना यश आलं नाही. त्यानंतर सन २००४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि विधानसभेत दाखल झाले. सन २००९ च्या निवडणूकीपूर्वी त्यांनी एनसीपीत प्रवेश केला. परंतु पक्षानं त्यांनी उमेदवारी नाकारली. त्यावेळी त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आणि ते पराभूत झाले.
सन २०१४ च्या निवडणूकीसाठी त्यांनी भाजपत प्रवेश केला आणि निवडणूक जिंकले. त्यापुढच्या निवडणुकीपुर्वीच त्यांना कॅन्सर झाला. तरीही त्यांनी निवडणुक लढवली परंतु त्यात त्यांना यश आलं नाही.
माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे मागे पत्नी, मूलगा, मुलगी, जावई, नातवंडे, चार भाऊ, पाच बहिणी असा परिवार आहे. पाचर्णे यांच्या निधनाने शिरूर तालुक्यावर व विशेषतः शिरूर पंचक्रोशीवर शोककळा पसरली.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.