Pune: घरातले सैतान; अल्पवयीन मुलीवर वडील, भाऊ, मामा आणि आजोबाकडून लैंगिक अत्याचार

11 वर्षीय मुलीवर अनके वर्षांपासून तिच्याच घरातील त्या लोकांकडून लैंगिक अत्याचार आणि बलात्कार होत होते
crime News
crime NewsSaam Tv
Published On

पुणे: मुली बाहेरच्या जगात तर सुरक्षित नाहीतच, पण त्या स्वत:च्या घरातही सुरक्षित नसल्याचं भयावह वास्तव दाखवणारी एक घटना पुण्यात समोर आली आहे. येथे एका 11 वर्षीय मुलीवर अनके वर्षांपासून तिच्याच घरातील त्या लोकांकडून लैंगिक अत्याचार आणि बलात्कार होत होते. ज्यांच्यावर तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी होती. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शाळेच्या कॉन्सलिंग सेशनमध्ये सदर प्रकार उघडकीस आल्याची माहिती आहे (Sexual abuse with a minor girl by father, brother, uncle and grandfather in Pune).

crime News
Pune Crime: मुलीला त्रास देतो म्हणून महिलेकडून तरुणाला घरात कोंडून मारहाण; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू...

पीडित मुलगी ही पुणे (Pune) शहरातील एका कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थिनी आहे. या शाळेच्या कॉन्सलिंग सेशनमध्ये सदर प्रकार मुलीने सांगितला. तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शाळा प्रशासनाने तात्काळ बंडगार्डन पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

पीडित मुलीचे आई वडील मूकबधिर असल्याची माहिती आहे. हे कुटुंब मूळचं बिहारचं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मुलीसोबत लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) होत असल्याचं पुढे आलं आहे. धक्कादायक म्हणजे तिच्याच वडिलांकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार होत होते. फक्त, वडिलच नाही तर भाऊ, चुलत मामा आणि आजोबा यांच्याकडूनही तिच्यावर वर्षानुवर्षे लैंगिक अत्याचार होतो आहे, अशी माहिती आहे.

याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी तिचे वडील आणि भावासह 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे. या घटनेने समाजाती एक भयावह वास्तव पुढे येतं. मुली या घराबाहेर तर नाहीच पण, घरातही सुरक्षित नसल्याचं या घटनेवरुन दिसून येते.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com