Hari Narke Passed Away: ज्येष्ठ साहित्यिक प्रा. हरी नरके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Hari Narke Passed Away: ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचं हृदयविकाराच्या निधन झालं आहे.
Senior Literary hari narke passed away due to heart attack in Mumbai hospital
Senior Literary hari narke passed away due to heart attack in Mumbai hospitalSaam TV
Published On

Hari Narke Passed Away: ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचं हृदयविकाराच्या निधन झालं आहे. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. काही दिवसांपासून हरी नरके यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Senior Literary hari narke passed away due to heart attack in Mumbai hospital
Dharmaveer 2 Announcement: ‘धर्मवीर’ च्या तुफान यशानंतर येतोय ‘धर्मवीर २’; खंडोबाच्या चरणी लीन होत निर्मात्यांनी केली घोषणा

हरी नरके यांच्या अचानक निघून जाण्याने समाजातील पुरोगामी विचार चळवळीला पोकळी निर्माण झाली आहे. हरी नरके यांच्या निधनाची बातमी कळताच साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, थोड्याच वेळात छगन भुजबळ एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत.

पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते. अनेक सामाजिक विषयांवर ते थेट भाष्य करत असतं. हरी नरके यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गटाला आपल्या ब्लॉगमधून आधार दिला होता.

Senior Literary hari narke passed away due to heart attack in Mumbai hospital
Kedar Shinde Offer For Movie : केदार शिंदेची पुरुषांसाठी भन्नाट ऑफर; १०० रुपयात पाहता येणार 'बाईपण भारी देवा' चित्रपट

त्यांचे अनेक लेख काही वर्तमानपत्रांतही प्रसिद्ध झाले आहेत. फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे, त्याचबरोबर शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा होता.

महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला, त्याचे संपादक हरी नरके होते. याशिवाय राज्य सरकारने डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे २६ खंड प्रकाशित केले होते. यातील ६ खंडाचे संपादन हरी नरके यांनी केले होते.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com