VIDEO : मुलीची छेड काढली; महिलांनी त्या टग्याला चोप चोप चोपलं, मुलीनं काठीनं झोडपून काढलं

Pune Viral Video : विनयभंग केल्याच्या या प्रकरणामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालीये. तसेच विद्यार्थिनींसह पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
Pune Viral Video
Pune Viral VideoSaam TV

पुणे शहरातील नागपूर चाळ भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थिनीला दुचाकी शिकवण्याचा बहाना करून जबरदस्तीने लज्जास्पद वर्तवणूक केल्याचं उघड झालंय. त्यामुळे मुलीसह अन्य महिलांनी त्याला चांगलाच चोप दिलाय. ही घटना येरवडा नागपूर चाळ या भागात घडली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विद्यार्थिनीला शाळेत जाण्यासाठी व्हॅन लावली होती. या व्हॅन चालकाने विद्यार्थिनीसोबत अशी जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. विनयभंग केल्याच्या या प्रकरणामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालीये. तसेच विद्यार्थिनींसह पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Pune Viral Video
Pune Porsche Car Accident: पुणे अपघातातील आरोपीचा बाल सुधारगृहातील मुक्काम वाढला, जामीन याचिका हायकोर्टाने फेटाळली

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी छेडछाड करणाऱ्याला चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलंय. अल्पवयीन तरुणीच्या छेडछाड प्रकरणी या व्यक्ती विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीये. घडलेल्या घटनेचा अधिक तपास येरवडा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

सदर घटनेचा व्हिडिओ काहींनी आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. वाहन चालकाने मुलीसोबत गैरवर्तन केल्याबरोबर तिने आरडाओरडा केला. तेव्हा रस्त्यावरील अन्य नागरिकांनी लगेचच वाहन थांबवले. त्यानंतर घडलेला प्रकार मुलीने सांगितल्यावर उपस्थित जमावाने या व्यक्तीला मारहाण केली.

काही महिलांनी त्या व्यक्तीला कानाखाली चापट मारल्या आहेत. तर काहींनी हातात काठ्या घेऊन या व्यक्तीची चांगलीच धुलाई केली आहे. सदर घटनेचा व्हिडिओ अनेकांनी आपल्या फोनमध्ये कैद केला. आता हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी देखील यावर संताप करत आहेत.

Pune Viral Video
Truck Driver Strike : अकोल्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा; ट्रक चालकांच्या संपाचा फटका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com