Pimpri-Chinchwad: शाळेच्या गणवेशात शाळकरी मुलीकडून चक्क दारुविक्री! व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसही चक्रावले

A school girl is selling alcohol: शाळेच्या गणवेशामध्ये ही मुलगी दारुड्यांना दारुचे फुगे विकत असल्याचं या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्ट दिसत आहे.
A school girl is selling alcohol
A school girl is selling alcoholगोपाल मोटघरे

पुणे: पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील देहूरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक शाळकरी मुलगी (School Girl) चक्क शाळेच्या गणवेशात दारू विकत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला आहे. शाळेच्या गणवेशामध्ये ही मुलगी दारुड्यांना दारुचे फुगे विकत असल्याचं या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्ट दिसत आहे. (A school girl is selling alcohol)

हे देखील पाहा -

ज्या वयात लहान मुलांनी शाळेचा गणवेश घालून अभ्यास करायला हवा, त्या वयात या लहान मुलीला दारुचे फुगे विकावे लागत आहे. ही मुलगी ज्या घरात राहते त्या घरात दारुचा व्यवसाय जोरात होत असल्याची माहिती समोर आली आहे. देहूरोड पोलीस स्टेशनच्या आशीर्वादानेच देहूरोड पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजीनगर, एम. बी. कॅम्प, पोटर चाळ आणि पार्टी चाळमध्ये अवैध दारु विक्रीचा जोरदार धंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

A school girl is selling alcohol
Chor Ganpati: नवसाला पावणाऱ्या सांगलीच्या 'चोर गणपती'ची प्रतिष्ठापना; सर्वधर्मीयांचे आहे श्रद्धास्थान

देहूरोड पोलीस स्टेशन हद्दीत शाळकरी मुलगी शाळेच्या गणवेशात दारू विकत असल्याचं लक्षात येताच पोलिसांची मात्र तारांबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी यात मात्र सावध पवित्रा घेतला आहे. "आम्ही त्या दारुड्याची लगेच माहिती घेऊन त्यावर धाड टाकून करवाई करणार आहोत" अशी माहिती पोलिसांनी साम टीव्हीला दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com