सावरकरांनी कधीही माफी मागितली नाही, त्यांनी आवेदन दिलं होतं; सात्यकी सावरकरांचं राहुल गांधींना चर्चेसाठी चॅलेंज

Satyaki Savarkar On Rahul Gandhi: माणसांच्या विचारांना काळाची मर्यादा आहे. कोणीही बोलावलं तरी संवाद साधायला तयार आहे असं सात्यकी सावरकर म्हणाले आहेत.
Satyaki Savarkar
Satyaki SavarkarSaam TV
Published On

Satyaki Savarkar Latest News: सावरकरांनी आवेदन दिले होते, त्यांच्यावर चिखलफेक कशासाठी? असा संतप्त सवाल सात्यकी सावरकर यांनी उपस्थित केला आहे. भारत जोडो यात्रेत कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दस आक्षेपार्ह विधान केले होते. यामुळे भाजप आणि मनसे कॉंग्रेसवर तुटून पडले आहे.

सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. यानंतर आता स्वतः सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सावरकरांवर चिखलफेक कशासाठी? सावरकरांनी माफी मागितली नव्हती, त्यांनी आवेदन दिलं होतं असा दावा सात्यकी सावरकर यांनी साम टीव्हीशी बोलताना केला आहे. (Savarkar Latest News)

Satyaki Savarkar
Video: औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटांचा पाऊस; पैशांच्या उधळणीचा व्हिडिओ व्हायरल

सात्यकी सावरकर म्हणाले, भारत जोडो यात्रा दक्षिण भारताच्या बऱ्याच भागातून गेली. महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी (Rahul Gandhi) सावरकरांचे नाव घेतले. अपकिर्ती करण्यासाठी सावरकरांचे नाव घेतले. राहुल गांधींनी सावरकरांची (Savarkar) आज पहिल्यांदा बदनामी केली नाही. राज्याचे वीर पुरूष इतर कोणाचे नाव घेतले नाही. सावरकरांना इंग्रजांनी बराकमध्ये पाठवलं नाही, कोठडीमध्ये सोडलं होतं म्हणून त्यांनी ब्रिटिशांना आवेदन पत्र दिलं. यात माफी मागायचा संबंध येतो कुठे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पुढे ते म्हणाले, एका राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याने अशी वक्तव्यं करण चूक आहे. त्यांना (राहुल गांधींना) ऐकून घ्यायचं नाहीये. आवेदन पत्राचा फक्त शेवटचाच भाग त्यांनी वाचला कारण त्यांनी तथ्य मांडायच नाहीये. त्याला माफीनामा म्हणणं चूक आहे. सुरुवातीपासून सावरकर म्हणतायेत, त्यांनी १० वेळा लिहिलं आहे की मला इतरांसारख्या सुविधा मिळाल्या नाहीत. Prisoner act मधल्या तरतुदी मिळाव्या यासाठी आवेदन केलं होतं असा दावा सात्यकी यांनी केला.

सात्यकी सावरकर पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यावीर सावरकर यांनी रत्नागिरीमध्ये अटीनुसार आणलं गेलं. हा माफीनामा नाही. राजकारणात सक्रिय सहभाग नाही ही अट होती. सशस्त्र क्रांतिकारक सावरकरांना भेटत होते. याच्या नोंदी नाहीयेत. पण भेटत होते. जातीभेद निर्मूलन काम त्यांनी सुरू ठेवलं. १३ वर्ष जे शक्य ते केलं. दोन पावलं मागे आलो म्हणजे हार पत्करली असे नाही. रत्नागिरीत धाडी पडल्या. तुरुंगात सुद्धा सावरकरांनी संप केले. त्याला डाग लावण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप सात्यकी सावरकर यांनी केला आहे.

Satyaki Savarkar
Aurangabad News: औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया, पाहा Video

त्याचप्रमाणे त्यांनी (सावरकरांनी) जात निर्मूलनाचे काम केले. पदवी नव्हती, दुसरं काय करणार? सोय म्हणून राजकारण केलं जातंय, दुसरी सोय म्हणून समाजकारण असं त्यांनी कधीच केलं नाही. प्राप्त परिस्थितीत देशसेवा हेच धेय्य होतं Hotsan गोगटे आणि बडी चव्हाण हे सावरकरांच्या तालमीत तयार झाले. दुसरी फळी सावरकरांनी निर्माण केली. असे जहाल मतवादी स्थानबद्ध असताना निर्माण केले. वीर सावरकर ही पदवी जोशी म्हणून आहेत त्यांनी दिली. नाटकाला गेले तिथे. अनेक लोक म्हणतात आचार्य अत्रेंनी दिली.

स्वतंत्र लढ्यात सहभाग म्हणजे भारतभर दौरे. सावरकर म्हणाले दुसाऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैन्यात भरती व्हा. ट्रेनिंग घ्या. मग बंदुकीचे टोक कुठे वळवायचे हे तुम्ही ठरवा. सावरकरांचे मूल्यमापन कोणी केलं नाही. आम्हाला किंवा अल्पासंख्यांक कोणालाच ज्यादा सुविधा नको हे सावरकर मांडायचे. एकाच घराण्याने स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला असं नाही असा टोला सात्यकी यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.

Satyaki Savarkar
Video: कल्याणच्या रेल्वे लोको शेडमध्ये आढळला कोब्रा नाग; कामगारांची झाली पळापळ

आत्ताच्या सरकारने सावरकर वाद जोपासला आहे. पूर्णतः सावरकर समजण्यासाठी काही काळ जावा लागेल. राजकीय व्यासपीठावरुन होणारी त्यांची मांडणी कमी पडतेय. जसा घोडा तशी गाय असं सावरकर मांडायचे. तेव्हाही कट्टरतावाद्यांनी विरोध केला. सावरकरांनी मुसलमान कट्टरवाद्यांशीही संवाद साधला. वर जनहित ध्येय हे सावरकरांचे वाक्य. कुठल्याही राजकीय पक्षाला सावरकरांची मत पूर्ण झेपू शकत नाहीत. आता सामाजिक समरसता मंच जी मांडणी करतो ती सावरकरांची. चिकित्सा व्हावी, प्रत्येक महापुरुषांची व्हावी. माणसांच्या विचारांना काळाची मर्यादा आहे. कोणीही बोलावलं तरी संवाद साधायला तयार आहे असं सात्यकी सावरकर म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com