Pune News : कॉंग्रेसची बॅनरबाजी सावरकर प्रेमींनी लावली उधळून

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस मार्फत हे फ्लेक्स लावले होते.
Pune News
Pune NewsSaam tv

Pune News : आज राहुल गांधी (Rahul Gandhi)यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात १२ वा दिवस आहे. या यात्रेत राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केल्याने विरोधक चांगलेच संतापले आहेत. सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घेत होते. त्यामुळे ते माफीवीर असल्याचे म्हणत काल राहुल गांधींनी या संदर्भातील पुरावे सादर केले. त्यामुळे क्रॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले आहेत. आज पहाटेच त्याचे पडसाद उमटलेले दिसले. (Latest Marathi News)

Pune News
Breaking News: राज्यभरात राहुल गांधी वक्तव्याविरोधात आंदोलनं; पाहा सविस्तर बातमी । SAAM TV

सावरकरांच्या पुतळ्यासमोर माफीवीर फ्लेक्स

राहुल गांधींनी पुरावे सादर केल्यावर आज सकाळी पुण्यातील (Pune) सारस बाग येथील सावरकरांच्या पुतळ्यासमोर माफीवीर असे बॅनर पाहायला मिळाले. नंतर महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस मार्फत हे फ्लेक्स लावण्यात आल्याचे समजले. काल मध्यरात्री दीड दोनच्या सुमारास हे फ्लेक्स लावले गेले होते. यात राहुल गांधींनी सादर केलेले पुरावे आणि माफीवीर असे फ्लेक्स होते. महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस मार्फत हे फ्लेक्स लावले होते.

Pune News
Mahavikas Aghadi | सावरकर वादामुळे मविआमध्ये ठिणगी?; पाहा काय आहे प्रकरण

सावरकर प्रेमींनी फाडले फ्लेक्स

राहुल गांधी यांनी काल सावरकरांविरोधात पुरावे सादर केल्याने राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. यात अनेक सावरकर प्रेमी देखील आपली मते मांडत निषेध नोंदवत आहेत. पुण्यात लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर अनेकांनी अक्षेप घेतला. तसेच एका सावरकर प्रेमीने हा फ्लेक्स फाडून टाकला. फ्लेक्स फाडणाऱ्या सावरकर प्रेमीचे नाव जितेंद्र वाघ असे आहे.

राहुल गांधी यांनी काल एक पत्रकार परिषद घेत हे पुरावे सादर केले. यानंतर राजकीय वातावरणात देखील गोंधळ सुरू झाला. राहुल गांधींनी पुराव्यासह वक्तव्य केल्याने सावकर माफीवीर आहेत का? असा प्रश्न अनेकजण उपस्थित करत आहेत. सावरकरांना माफीवीर म्हटल्याने आता सावरकर प्रेमी देखील संताप व्यक्त करत आहेत. तसेच राहुल गांधींवर जहरी टीका करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com