सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहकार्य करा: हर्षद काळे

गणेशोत्सवादरम्यान कोविड प्रतिबंधात्मक बाबींच्या परिपूर्ण अंमलबजावणीचे आवाहन
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहकार्य  करा: हर्षद काळे
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहकार्य करा: हर्षद काळे
Published On

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार आज महत्वपुर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील त्यांच्या स्तरावर याबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर रोजच्या दैनंदिन जीवनात आपण ज्याप्रमाणे कोविड प्रतिबंधात्मक बाबींची काळजी घेत आहोत, त्याचप्रमाणे गणेशोत्सवादरम्यान देखील कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहकार्य  करा: हर्षद काळे
तुम्हालाही पावसाळ्यात सर्दी-खोकला होतो का? मग हे ५ उपाय ट्राय कराच

महापालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभाग कार्यालयात परिमंडळ – २ चे उप आयुक्त तथा गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांच्या मार्गदर्शन केले. यंदाचा गणेशोत्सव हा गेल्यावर्षी प्रमाणेच कोविड साथरोगाच्या पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे गेल्यावर्षी ज्या गणेश मंडळांना परवानग्या देण्यात आल्या होत्या, त्या गणेश मंडळांना यावर्षी देखील गेल्यावर्षीच्या धर्तीवर परवानग्या देण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरु झाली आहे. तसेच कृत्रिम तलाव, श्री गणेश मूर्ती संकलन केंद्रे इत्यादींची कार्यवाही व संख्या ही गेल्यावर्षी प्रमाणेच असणार आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यथोचित सहकार्य वेळोवेळी करावे, असे यावेळी हर्षद काळे यांनी सांगितले.

या अनुषंगाने महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस दल यांच्याद्वारे वेळोवेळी देण्यात येणा-या सुचनांचे परिपूर्ण पालन करण्याचे आवाहन देखील काळे यांनी आजच्या बैठकीदरम्यान केले. या बैठकीला बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती, मुंबई उपनगरे गणेशोत्सव समन्वय समिती, मूर्तीकार संघ इत्यादी संस्था - संघटनाच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेचा माहिती तंत्रज्ञान विभाग, लेखा विभाग आणि इतर संबंधीत विभागांचे प्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीदरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मंडप उभारणी इत्यादी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com