Shivsena Vs BJP: भाजपचा शिमगा रोजच सुरु - राऊतांचा टोला

महाराष्ट्रात सुद्धा खूप खड्डे खणलेले आहेत, त्या खड्ड्यात कोण पडेल आणि कोणाला ढकलले जाईल हे तुम्हाला हळूहळू दिसेल, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला उद्देशून लगावला
Shivsena Vs BJP: भाजपचा शिमगा रोजच सुरु - राऊतांचा टोला
Shivsena Vs BJP: भाजपचा शिमगा रोजच सुरु - राऊतांचा टोला saam tv
Published On

मुंबई : होळी वर्षातून एकदा येते पण यांचा शिमगा रोजच सुरू असतो, आम्ही जर यांचा शिमगा करायला सुरुवात केला तर महाराष्ट्रात सुद्धा खूप खड्डे खणलेले आहेत, त्या खड्ड्यात कोण पडेल आणि कोणाला ढकलले जाईल हे तुम्हाला हळूहळू दिसेल, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला उद्देशून लगावला. (Sanjay Raut Taunts Bjp over government Formations)

"आम्ही राजकीय धुळवड कधीच खेळत नाही, मात्र सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) धुळवड रोजच सुरू आहे, ती थांबली पाहिजे, वर्षातून एकदा अशी धुळवड खेळायला काहीच हरकत नाही, बुरा न मानो होली है, काही ठिकाणी शिमगा आणि होळी मध्ये फरक असतो, भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्यांनी शिमग्याचा खरा अर्थ समजून घ्यावा आणि त्या पद्धतीचे रंग त्यांनी खेळावेत. महाराष्ट्राचा जो रंग आहे, हा स्वाभिमानाचा आणि ऐक्याचा रंग आहे, तो त्यांनी समजून घ्यावा,'' असेही राऊत म्हणाले.

Shivsena Vs BJP: भाजपचा शिमगा रोजच सुरु - राऊतांचा टोला
Kolhapur Election: कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला

भाजपच्या सत्तेबद्दलच्या दाव्यांबद्दल बोलताना राऊत म्हणाले, ''आमचे बीजेपीतले मित्र रोज तारखा देत आहेत, रोज रंग उधळत आहेत, ते नकली रंग आहेत, अशा नकली रंगांवर केंद्र सरकारची बंदी आहे, त्यामुळे काल त्यांना पवार साहेब (Sharad Pawar) यांनी उत्तर दिले आहे, काही झाले तरी ते पुन्हा येणार नाहीत, पण प्रयत्न करायला काही हरकत नाही. लाल हा त्यांचा आवडता रंग म्हणण्यापेक्षा त्यात फार भेसळ आहे, चुकीचा रंग ते वापरतात. तुमच्या त्या भेसळीच्या रंगाला आम्ही घाबरत नाही,''

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com