Uddhav Thackeray and Raj Thackeray : राज ठाकरेंचा प्रतिसाद नाकारण्याचा करंटेपणा आम्ही करणार नाहीत; संजय राऊतांची सकारात्मक भूमिका

Uddhav Thackeray and Raj Thackeray : उद्धव ठाकरेंनी मांडलेली मांडलेली भूमिका हिताची आहे, आणि आमची भूमिका देखील हिताची आहे. राज ठाकरेंचं वक्तव्य मी आणि उद्धव ठाकरेंनी ऐकलंय. आम्ही सकारात्मक भूमिकेतून याकडे पाहतोय.
 Uddhav Thackeray and Raj Thackeray coming together
Uddhav Thackeray and Raj Thackeray coming togetherSaam Tv News
Published On

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बंधू उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर मोठं विधान केलं आहे. अभिनेते आणि राज ठाकरेंचे मित्र महेश मांजरेकर यांच्या Podcast मध्ये राज ठाकरेंनी या युतीवर भाष्य केलं. 'महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील भांडणं, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत', असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चांनंतर खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी मांडलेली मांडलेली भूमिका हिताची आहे, आणि आमची भूमिका देखील हिताची आहे. राज ठाकरेंचं वक्तव्य मी आणि उद्धव ठाकरेंनी ऐकलंय. आम्ही सकारात्मक भूमिकेतून याकडे पाहतोय. माझी उद्धव ठाकरेंसोबत आज सकाळी आणि काल रात्री देखील चर्चा केली. आम्ही हवेत बोलत नाहीय, महाराष्ट्र आणि मुंबईच्या मराठी माणसाच्या हितासाठी आम्हाला एकत्र यावच लागेल, असं म्हणत संजय राऊत यांनी देखील सकारात्मक भूमिका दाखवली आहे.

 Uddhav Thackeray and Raj Thackeray coming together
Uddhav Thackeray : छत्रपती शिवरायांची शपथ घ्यायची, त्यानंतरच....राज ठाकरेंच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंनी नेमकी काय अट ठेवली?

आम्ही राज ठाकरेंची वाट पाहू. राज ठाकरेंकडून रिप्लाय आला तर, आम्ही तो नाकारण्याचा करंटेपणा करणार नाहीत. सर्व शिवसैनिक आणि सर्व ठाकरे एकच आहेत. व्यक्तिगतरित्या आम्ही जवळ आहोत, राज ठाकरे उद्धव ठाकरेंचे भाऊ आहेत हे तुम्ही मान्य करा. राज ठाकरेंनी आता मन मोकळं केलंय. त्यांची आणि आमची रक्ताची नाती आहेत

राज ठाकरे काय म्हणाले होते?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत महेश मांजरेकरांनी राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंसोबतच्या युती संदर्भात थेट प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, 'आमच्यातील वाद, आमच्यातील भांडणं, आमच्यातील गोष्टी किरकोळ आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद, या गोष्टी, अत्यंत क्षुल्लक आहेत', असं राज ठाकरे म्हणाल होते.

महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंना या मुलाखतीमध्ये उद्धव छाकरेंच्या शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का? असा स्पष्ट प्रश्न विचारला. यावर मराठी माणसाच्या अस्तित्वापुढे वाद भांडण क्षुल्लक असल्याचं मोठं विधान राज ठाकरेंनी केलं. त्यामुळे भविष्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचे हे संकेत आहेत का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

 Uddhav Thackeray and Raj Thackeray coming together
Uddhav Thackeray : टाळी दोन्ही हातानं वाजली! राज ठाकरेंसोबत जाण्यास उद्धव ठाकरे तयार, पण ठेवली एक अट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com