संजय राऊतांची आज दुपारी पुन्हा पत्रकार परिषद; भाजपच्या कोणता नेता टार्गेटवर?

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत.
संजय राऊतांची आज दुपारी पुन्हा पत्रकार परिषद; भाजपच्या कोणता नेता टार्गेटवर?
संजय राऊतांची आज दुपारी पुन्हा पत्रकार परिषद; भाजपच्या कोणता नेता टार्गेटवर?Saam Tv

मुंबई: शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत. आज दुपारी ४ वाजता शिवसेना भवनामध्ये (Shiv Sena Bhavan) ही पत्रकार परिषद होणार आहे. या अगोदर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर आरोप केला होता. तसेच, भाजप नेत्यांकडून केंद्रीय यंत्रणांचा होणाऱ्या गैरवापरावर होत असल्याने संजय राऊतांनी बोट ठेवले आहे. गेल्या पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि नील सोमय्यांना (Neil Somaiya) तुरुंगामध्ये टाकणार असल्याचे राऊत यावेळी म्हणाले होते. (Sanjay Raut press conference again this afternoon BJP Leader target)

हे देखील पहा-

तसेच मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावर देखील राऊतांनी गंभीर आरोप (Allegations) केले होते. यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत राऊतांच्या निशाण्यावर कोण असणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल स्वतः ट्वीट करुन पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली आहे. या अगोदर राऊतांनी १५ फेब्रुवारीला शिवसेना भवनात दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेत भाजपसह (BJP) केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर त्यांच्या निशाण्यावर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या होते.

तसेच, पत्रकार परिषदेनंतर जेव्हा- जेव्हा संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला आहे, त्यावेळी त्यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. एवढेच नाहीतर, लवकरच हे पिता- पुत्र तुरुंगामध्ये जाणार असल्याचा दावा देखील संजय राऊतांनी नेहमी करत आहे. यामुळे आता आज ते कोणता बॉम्ब फोडणार? कोणते नेते त्यांच्या निशाण्यावर असणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून लागले आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने छापा टाकला होता. हा छापा जवळपास ४ दिवस सुरु होता.

संजय राऊतांची आज दुपारी पुन्हा पत्रकार परिषद; भाजपच्या कोणता नेता टार्गेटवर?
Women's Day Special: मुंबई महिला पोलिसांना मोठं गिफ्ट; आता 8 तासांची असणार ड्युटी

यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या कारवायांवर संजय राऊत काय प्रत्युत्तर देणार आहेत. हे बघणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. मुंबईत कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचा देखील गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. एवढेच नाहीतर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. जाधव यांचे संपूर्ण पितळ उघडे करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचे किरीट सोमय्या यावेळी म्हणाले होते. यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोप होत असल्याचे बघायला मिळाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com