Women's Day Special: मुंबई महिला पोलिसांना मोठं गिफ्ट; आता 8 तासांची असणार ड्युटी

जागतिक महिला दिनानिमित्त मुंबईचे (Mumbai) पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलीस दलामधील महिला कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले
Women's Day Special: मुंबई महिला पोलिसांना मोठं गिफ्ट; आता 8 तासांची असणार ड्युटी
Women's Day Special: मुंबई महिला पोलिसांना मोठं गिफ्ट; आता 8 तासांची असणार ड्युटीSaam Tv

मुंबई: जागतिक महिला दिनानिमित्त मुंबईचे (Mumbai) पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलीस दलामधील महिला कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. आजपासून मुंबई पोलीस (police) दलामधील महिलांना ८ तासांची ड्युटी असणार आहे. घर आणि कर्तव्य यामध्ये समतोल करता यावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. महिला (Women's) दिनापासून पुढील आदेशापर्यंत महानगरात हे निर्देश लागू असणार आहे, असे अधिकार्‍यांनी यावेळी सांगितले आहे. (Mumbai women police will now be 8 hours duty)

हे देखील पहा-

या अगोदर राज्याचे प्रभारी पोलीस महासंचालक म्हणून काम बघणारे संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी या वर्षी जानेवारीत ८ तासांच्या ड्युटी शेड्यूलची सुरुवात केली होती. पोलीस आयुक्तांच्या दिलेल्या आदेशानुसार, महिला कर्मचार्‍यांसाठी २ पर्याय आहेत. पहिल्या पर्याय, त्यांना सकाळी ८ ते ३, दुपारी ३ ते १० आणि रात्री १० ते सकाळी ८ अशा ३ शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये सकाळी ७ ते दुपारी ३, दुपारी ३ ते ११ आणि रात्री ११ ते सकाळी ७ अशा शिफ्टच्या वेळा असणार आहेत, असे एका अधिकाऱ्याने यावेळी सांगितले आहे.

Women's Day Special: मुंबई महिला पोलिसांना मोठं गिफ्ट; आता 8 तासांची असणार ड्युटी
पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची नागपूर कारागृहातून सुटका

तत्कालीन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये पोलीस अंमलदारांसाठी ८ तासांची ड्युटी सुरु केली होती. ऑन ड्युटी २४ तास असणाऱ्या पोलिसांसाठी हा सुखद निर्णय होता. परंतु, कोरोना (Corona) महामारीमुळे पोलिसांच्या ड्युटीचे गणित बिघडले आणि परत अगोदरप्रमाणे कामाचे तास सुरु झाले आहेत.

आता संजय पांडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यावर, महिला दिनाचे औचित्य साधून महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोठा आणि महत्त्वाचा आदेश जारी करण्यात आला आहे. महिला दिनापासून पुढील आदेशापर्यंत सर्व पोलीस ठाण्यांमधील महिला कर्मचाऱ्यांना ८ तासांची ड्युटी असणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com