Sanjay Raut News : राज्यात जागावाटपाचा कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही, जो जिंकेल त्याची जागा : संजय राऊत

Political News : राज्यात बेकायदेशीर सरकार काम करत आहे, त्याला कुठलाही आधार नाही.
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSAAM TV

New Delhi :

इंडिया आघाडीची समन्वय समितीची महत्त्वाची बैठक काल पार पडली. या बैठकीत जागावाटपाबाबत काय चर्चा झाली याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

जागावाटप महत्त्वाचा मुद्दा आहे. जागावाटप हे त्या त्या राज्यस्तरावर व्हावं, असं कालच्या बैठकीत ठरलं आहे. महाराष्ट्रात तशी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रात जागावाटपाचा कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही. जो जिंकेल त्याला ती जागा सोडू असं आमचं ठरलं आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.  (Latest Marathi News)

Sanjay Raut News
Hotel Bademiya : मुंबईतील प्रसिद्ध बडेमिया हॉटेलला टाळं, FDAची कारवाई; किचनमध्ये आढळले उंदीर, झुरळे

राज्यातील सरकार बेकायदेशीर

आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर विधीमंडळात आज सुनावणी सुरु होत आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्देश देऊनही आमदार अपत्रतेचा निर्णय घ्यायला अध्यक्षांनी टाळाटाळ केली. राज्यात बेकायदेशीर सरकार काम करत आहे, त्याला कुठलाही आधार नाही.

शिवसेनेत फूट पाडून सरकार पाडलं. अजित पवार आणि आमदार राष्ट्रवादीतून फोडले आणि सरकारमध्ये घेतले. घटनेचं पालन करण्यासाठी त्यांना सद्बुद्धी मिळो, असं संजय राऊत यांनी म्हटलं. (Political News)

Sanjay Raut News
Pune Breaking News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकाने दिला तडकाफडकी राजीनामा

सरकारच्या चेहऱ्यावर भीती

सरकारच्या चेहऱ्यावर भीती दिसत आहे. अजित पवार जरी अनुभवी असले तरी त्यांची सरकार चालवताना दमछाक होत आहे. सरकारच्या दृष्टीने मराठा आंदोलनाचा मुद्दा किती गंभीर आहे हे आपल्याला क्लिपमधून दिसून आलं, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com