Pune Breaking News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकाने दिला तडकाफडकी राजीनामा

Rajabhau Bhilare resigns: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्यातील कट्टर समर्थक राजाभाऊ भिलारे यांनी शिवसेना (शिंदे गट) उपशहर प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.
Big blow to CM Eknath Shinde  Rajabhau Bhilare resigns pune shivsena
Big blow to CM Eknath Shinde Rajabhau Bhilare resigns pune shivsenaSaam TV
Published On

Rajabhau Bhilare Shiv Sena resigns

शिंदे गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्यातील कट्टर समर्थक राजाभाऊ भिलारे यांनी शिवसेना (शिंदे गट) उपशहर प्रमुखपदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. "कोणाच्याही बंधनात काम करू शकत नाही," असं म्हणत राजाभाऊ भिलारे यांनी पुणे शिवसेना उपशहर प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. (Latest Marathi News)

Big blow to CM Eknath Shinde  Rajabhau Bhilare resigns pune shivsena
Maharashtra Politics: शिंदे की ठाकरे, कुणाचे आमदार अपात्र ठरणार? विधानसभा अध्यक्षांसमोर आज होणार सुनावणी

शिंदे गटाला (Eknath Shinde) बसलेला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राजाभाऊ भिलारे हे नाराज असल्याची चर्चा होती. शिंदे गटाकडून त्यांची मनधरणी सुरू असल्याचं बोललं जात होतं. मात्र, बुधवारी राजाभाऊ भिलारे यांनी थेट शिवसेना उपशहर प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.

राजाभाऊ भिलारे हे शिंदे गटात सामील होणारे पुण्यातील शिवसेनेतील (Shivsena) पहिले पदाधिकारी होते. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर भिलारे यांनी सर्वात अगोदर शिंदे यांना समर्थन दिलं होतं. भिलारे यांच्याकडे एकनाथ शिंदे हे चालवत असलेल्या वैद्यकीय समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्षपद होतं.

Big blow to CM Eknath Shinde  Rajabhau Bhilare resigns pune shivsena
Maharashtra Rain Updates: राज्यात आज तुफान पाऊस बरसणार; या जिल्ह्यांना झोडपून काढणार, वाचा IMD अंदाज

गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या प्रचार प्रसाराची जबाबदारी त्यांच्यावर होती. दरम्यान, "मी कोणाच्याही बंधनात काम करू शकत नाही," असं म्हणत राजाभाऊ भिलारे यांनी पुणे शिवसेना उपशहर प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुण्यात शिंदे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेना आमदार अपात्रेवर आजपासून सुनावणी

शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटातील आमदारांच्या पात्र अपात्रतेवर आजपासून सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर विधिमंडळाच्या सभागृहात आज दिवसभर ही सुनावणी चालणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या आमदारांचं काय होणार? एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार राहणार की जाणार? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com