Pimpri-Chinchwad News: मुळा नदीत जेसीबीद्वारे हजारो ब्रास वाळूची तस्करी, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

Sand Smuggling: पुणे जिल्ह्यात मुळा नदीपात्रात वाळू तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. जेसीबी आणि पोकलँड मशीन वापरून मध्यरात्री वाळू चोरी केली जात असल्याचे व्हिडिओ साम टीव्हीला प्राप्त झाले आहेत.
Pune JCB
Pune JCBsaam tv
Published On

गोपाळ मोटघरे/साम टीव्ही न्यूज

पुणे जिल्ह्यातील मुळा नदीपात्रातून वाळू तस्करीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाळू तस्कर जेसीबी आणि पोकलँड मशीनच्या सहाय्याने मुळा नदीच्या पात्रात मध्यरात्री वाळू चोरी करत असतानाचे व्हिडिओ मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये दिसते की, वाळू तस्कर गेल्या कित्येक दिवसांपासून बेकायदेशीरपणे वाळू चोरून तस्करी करत आहेत. मुळा नदीतील पिंपळे निलख भागात हे घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे, जिथे ते जेसीबी आणि पोकलँड मशीनचा वापर करून हजारो ब्रास वाळू तस्करी करत होते.

विशेष म्हणजे, वाळू तस्कर हे मध्यरात्रीच्या वेळी नदीपात्रात वाळू तस्करी करत असून, त्यांना महसूल प्रशासनाचे लक्षही जात नाही. पुणे जिल्ह्यात वाळू उपसा करण्यावर पूर्णपणे बंदी आहे तरीही वाळू तस्कर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून देऊन हे अवैध कृत्य करत आहेत. या प्रकरणावर आम आदमी पक्षाचे पदाधिकारी रविराज काळे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

Pune JCB
Maharashtra Weather: सतर्क रहा! हवामान खात्याचा मोठा इशारा, महाराष्ट्रात पुढील ५ दिवस अवकाळी पावसाची शक्यता

रविराज काळे यांनी या प्रकरणी पुणे जिल्हा महसूल प्रशासनाकडे लेखी मागणी केली आहे. त्यांच्या मागणीमध्ये तस्करीसाठी वापरलेली जेसीबी आणि पोकलँड मशीन तसेच डंपर ट्रक जप्त करण्याची मागणी केली आहे. यावर प्रशासनाने तातडीने कारवाई करून, आरोपींविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.

Pune JCB
Jalgaon News: बोगस ४९ शिक्षकांना ५० हजार पगार, नाशिकच्या लेखाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

वाळू तस्करीचे हे प्रकरण महाराष्ट्रातील वाळू तस्करीच्या गंभीर समस्येला उघडकीस आणते. यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा प्रकारच्या तस्करीला वाव मिळत असल्याचे लक्षात येते. प्रशासनाने त्वरित कारवाई केली पाहिजे, जेणेकरून नदीपात्रातील पर्यावरण आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण होऊ शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com