Sunburn Festival: मुंबईत सनबर्न फेस्टिव्हल नकोच! सनातन संस्थेचा कडाडून विरोध

Sanatan Sanstha Protest: सनबर्न फेस्टिव्हल मुंबईत प्रथमच होणार असताना सनातन संस्थेने अंमली पदार्थ, युवकांची सुरक्षा आणि पर्यावरणीय धोक्यांचा मुद्दा उपस्थित करत जोरदार विरोध केला आहे.
SANBURN FESTIVAL FACES STRONG OPPOSITION IN MUMBAI FROM SANATAN SANSTHA
SANBURN FESTIVAL FACES STRONG OPPOSITION IN MUMBAI FROM SANATAN SANSTHASaam Tv
Published On

आशिया खंडातील सर्वात मोठा डान्स म्युझिक फेस्टिव्हल म्हणून ओळखला जाणारा सनबर्न फेस्टिव्हल आता या वर्षी गोव्यामध्ये न होता पहिल्यांदाच मुंबईमध्ये होणार आहे. आयोजकांनी केलेल्या अधिकृत घोषणेनुसार हा तीन दिवसांचा फेस्टिव्हल 19,20 आणि 21 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

मात्र या फेस्टिव्हल होऊ दिला जाणार नाही असा इशारा सनातन संस्थेने दिला आहे. मुंबईतून सनबर्न फेस्टिव्हल हद्दपार करा आणि युवा पिढीचे अंमली पदार्थांपासून रक्षण करा असे पत्रक जारी करत त्यांनी मुंबईकरांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. मागच्या काही दिवसांपासून युवा पिढी ही अंमली पदार्थांच्या आहारी गेली आहे. राज्यांमध्ये पोलीस हे सापळा रचून अंमली पदार्थांचा साठा जप्त करत आहे.

SANBURN FESTIVAL FACES STRONG OPPOSITION IN MUMBAI FROM SANATAN SANSTHA
Mumbai : लिंक रोड,टनेल रोड ते कोस्टल रोड, मुंबईचा कायापालट होणार ; मेट्रोच्या बड्या अधिकाऱ्यानं सांगितला रोड मॅप

वर्षअखेरीस विदेशी संगीत, पॉप गायक यांचा समावेश असलेला हा इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टिव्हल होतो. याचे आयोजक कितीही सांगत असले की, फेस्टिव्हलमध्ये अंमली पदार्थांचा वापर होत नाही. तरी वस्तुस्थिती भयावह आहे. या फेस्टिव्हलमध्ये अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्या युवकांना त्यांच्या जाळ्यात ओढतात. त्यातील ध्वनिप्रदूषण आणि लेझर किरणे यांमुळे बालके, वयस्कर, रुग्ण यांना प्रचंड त्रास होतो. तसेच ज्या ठिकाणी हा फेस्टिव्हल होतो. तेथील भूमी, पर्यावरण यांची देखील हानी केली जाते. त्यामुळेच गोव्यात सनबर्न फेस्टिवलला विरोध झाल्यावर आणि सरकारचे कोट्यवधी रुपये बुडवून आता तो मुंबईमध्ये होत आहे. त्यामुळे सावध व्हा आणि सनबर्न फेस्टिव्हलला विरोध करा असे आवाहन सनातन संस्थेचे समन्वयक बळवंत पाठक यांनी केले आहे.

SANBURN FESTIVAL FACES STRONG OPPOSITION IN MUMBAI FROM SANATAN SANSTHA
नवले पूल अपघातानंतर वाहतूक विभाग खडबडून जागं झालं, घेतला मोठा निर्णय

सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोध कसा करणार?

सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात एक्स, इन्स्टाग्राम व्हाट्स अप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि सामाजिक माध्यमे, संकेतस्थळे, वृत्तपत्रे, खाजगी चॅनेल्स वरून विरोध करा

स्थानिक लोकप्रतिनिधिना पत्र देऊन नशेखोरीविरुद्ध आवाज उठवण्यास प्रवृत्त करा

आपल्या जवळचे राष्टरनिष्ठ, संस्कृतीप्रेमी, समाजसेवक, युवक आदींना एकत्र करून प्रशासनाला सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात निवेदन द्या असे सनातन संस्थेकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com