संभाजीराजेंनी ऑफर नाकारली; शिवसेना उमेदवार जाहीर करणार, 'या' नावांची चर्चा

उद्धव ठाकरे उद्या राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी ज्येष्ठ शिवसैनिकाचे नाव जाहीर करणार असल्याची शक्यता आहे.
Sambhajiraje Chhatrapati, Uddhav Thackeray
Sambhajiraje Chhatrapati, Uddhav ThackeraySaam Tv
Published On

मुंबई: संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी शिवसेना पुरस्कृत राज्यसभेची उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे आता शिवसेना उद्या सहाव्या जागेसाठी उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी ज्येष्ठ शिवसैनिकाचे (Shivsena) नाव जाहीर करणार असल्याची शक्यता आहे.

येत्या २६ मे रोजी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि उद्या जाहीर होणारे उमेदवार त्यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुसऱ्या जागेसाठी उर्मिला मातोंडकर यांचे नाव चर्चेत होते, पण त्यांच्याविषयी शिवसेनेने कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. शिवसेना संभाजीराजे यांची आज दुपारी १२ वाजेपर्यंत वाट पाहणार होती, पण संभाजीराजे वर्षा बंगल्यावर गेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावाला आता पूर्णविराम मिळाला असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील पाहा

Sambhajiraje Chhatrapati, Uddhav Thackeray
Sambhaji Raje : शिवसेनेत प्रवेश न करण्यावर संभाजीराजे ठाम..!

शिवसेना (Shivsena) दुसरा उमेदवार २५ तारखेला जाहीर करणार आहे. गेल्या राज्यसभा टर्ममध्ये भाजप पुरस्कृत होतो अश्यात या सरकारने मला महाविकास आघाडी पुरस्कृत म्हणून अपक्ष निवडणूक लढविण्याची संधी द्यावी यावर संभाजीराजे ठाम आहेत. कुठल्याही पक्षात गेल्यास मराठा समाज दुखावला जाईल. त्या समाजासाठी मी संघटना काढली आहे पक्ष नाही, असाही संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) यांचा दावा आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस सहकार्याची भूमिका घेते मग शिवसेनेनेही एक पाऊल पुढे यावे असे संभाजीराजे याचं मत असल्याची सुत्रांकडून माहिती मिळाली आहे. दरम्यान अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी करत संभाजीराजे यांनी आपल्या परीने मतांची जुळवाजुळवही सुरू केल्याची माहिती आहे.

संजय राऊत यांनीही शिवसेना दुसरी जागा लढणार असल्याचे जाहीर केले आहे. दुसरा उमेदवार हा शिवसेनेचा असणार आणि तो शिवसैनिकच असणार असं राऊत यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता शिवसेना (Shivsena) राज्यसभेसाठी आपला उमेदवार जाहीर करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com