
सचिन जाधव
Sambhaji Raje News Today: माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात स्वराज्य भवनाचं लोकार्पण केले. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीत ताकतीने उतरणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी प्रस्थापित राजकारण्यांवर त्यांनी टीका केली. (Latest Marathi News)
सगळेच राजकीय नेते माजले आहेत. सगळ्या नेत्यांना वाटतं की आपण सुसंस्कृत आहोत. पण मी सगळ्या नेत्यांचा माज काढू शकतो. चूक त्यांची नाही कारण आपण त्यांना निवडून देतो, हे सगळे लोकं आपल्याल खोट बोलतात. या लोकांनी आपला खेळ खंडोबा केला आहे. वेळ आली की शिवाजी महाराजांच नावं वापरतात. पण आता आपणं बाहेर पडून सर्व सामन्यांना ताकत दिली पाहिजे असं म्हणत संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी राजकीय नेत्यांवर टीका केली आहे.
सरकार कडे मास्टर प्लॅन नाही
आज शिक्षणच बाजारीकरण झाल आहे. सरकार म्हणून ७५ वर्षात यांनी शिक्षणासाठी काय केलं याचं उत्तर या सगळ्या सरकारांनी दिलं पाहिजे. राज्यातून उद्योग बाहेर जात आहेत. सगळ्यात जास्त टॅक्स आपला राज्य भरतो. सगळे मोठे उद्योगपती राज्यातले आहेत. तरी सगळे उद्योग राज्याच्या बाहेर चालले आहेत ही शोकांतिका आहे. सरकार कडे मास्टर प्लॅन नाही. सगळे उद्योग बंद पडले आहेत. सरकारच कसल नियोजन नाही असे देखील संभाजीराजे म्हणाले. (Political News)
सगळे राजकारणी माजले आहेत
राजकारणाची पातळी किती खाली गेली आहे. सगळे राजकारणी माजले आहेत. कुठलाच राजकारणी विकासावर बोलत नाहीतर. सगळे राजकारणी एकमेकांवर टीका करतात. हा संस्कृत महाराष्ट्र आहे का? हा आपल्या साधुसंतांचा महापुरुषांचा महाराष्ट्र आहे का?आपण सुसंस्कृत महाराष्ट्र घडवू वेगळी दिशा देऊ. सगळ्या आमदारांनी खासदारांनी गडकोट किल्ल्यांसाठी काय केलं ते मला सांगावं, असं आव्हान संभाजी राजे यांनी यावेळी दिलं.
2024 ला निवडणूक लढवणार
स्वराज्य कुठल्याही परिस्थितीत 2024 ला निवडणूक लढवणार सा निर्धार संभाजीराजेंनी व्यक्त केला आहे. स्वराज्य यापुढे सक्षम पर्याय म्हणून येणार आहे. त्यामुळे २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागा. घाबरण्याची गरज नाही. माझा विश्वास आहे, सुसंस्कृत नेता स्वराज्यात येणारचं. आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुण घ्यायचे आहेत,” असेही संभाजीराजेंनी सांगितलं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.